During the Ganesh immersion in Rajapur, the three sank | राजापुरात गणेश विसर्जनावेळी तिघे बुडाले
राजापुरात गणेश विसर्जनावेळी तिघे बुडाले

राजापूर : गणेश विसर्जन करताना दोन वेगवेगळ्या ठिकाणी तिघेजण बुडाले आहेत. अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनाप्रसंगी हा प्रकार घडला. तिघांचा शोध सुरू आहे. एक दुर्घटना जैतापूरनजीक बंदर पडवे येथे घडली आहे. कुलदीप वारंग आणि रोहित भोसले अशी येथे बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. विसर्जनासाठी खाडीत उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. ते बेपत्ता झाले असून अद्याप शोध कार्य सुरू आहे.
कुलदीप वारंग व रोहित भोसले हे सध्या मुंबई येथे राहत असून गणेशोत्सवासाठी गावी आले होते. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नाटे सागरी ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दिलीप काळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून दोघांचा शोध सुरू आहे.
दुसरी घटना राजापूर तालुक्यातील धोपेश्वर येथे घडली आहे. नदीत गणपती विसर्जन करताना सिद्धेश तेरवणकर हा २० वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे. त्याचाही शोध सुरू आहे.

Web Title: During the Ganesh immersion in Rajapur, the three sank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.