शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

राजकीय पक्षांनी बदलले आपले मित्र, पदवीधर मतदारसंघाचे धूसर चित्र; महायुतीसह आघाडीचीही कसोटी

By मनोज मुळ्ये | Updated: May 15, 2024 12:23 IST

इच्छुकांची संख्या मोठी, महायुतीसह आघाडीचीही कसोटी

मनोज मुळ्येरत्नागिरी : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे बिगुल वाजले आहेत, मात्र बदललेली राजकीय समीकरणे, युती आणि आघाडीतील बदललेले मित्र, तसेच सरकारी पातळीवरून झालेली पदवीधर मतदार नोंदणी यामुळे आता या निवडणुकीचे चित्रही धूसर झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाकडून इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. त्यामुळे ही निवडणूकही रंगतदार होण्याची शक्यता आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आता त्याच्या उमेदवारीबाबतची चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक पक्षाकडूनच इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी कोणता पक्ष लढणार आणि मग त्या पक्षाचा उमेदवार कोण असणार, ही जशी राजकीय पक्षांची कसोटी होती, तशीच कसोटी याहीवेळी इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे लागणार आहे.२५ जून २०१८ रोजी झालेल्या या मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या निरंजन डावखरे यांनी शिवसेनेच्या संजय मोरे यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून) त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर होती.

भाजपची मक्तेदारीबारा वर्षे वसंतराव पटवर्धन, बारा वर्षे डॉ. अशोक मोडक, सहा वर्षे संजय केळकर अशी सलग ३० वर्षे कोकण पदवीधर मतदारसंघ भाजपकडे होता. या मतदारसंघाच्या २०१२ साली झालेल्या निवडणुकीत भाजपची मक्तेदारी मोडून काढत राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे या मतदारसंघात विजयी झाले. त्यानंतर या मतदारसंघाच्या २०१८ च्या निवडणुकीपूर्वी डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि २५ जून २०१८ रोजी झालेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार म्हणून विजयी झाले.

सरकारी नोंदणींमुळे राजकीय पक्षांचा गोंधळआतापर्यंत पदवीधर मतदारसंघातील नोंदणी केवळ राजकीय पक्षच करून घेत होते. त्यामुळे ज्याने मतदार नोंदणी अधिक करून घेतली, त्याला संधी अधिक असे गणित होते. त्या-त्या पदवीधरांशी संपर्कात राहणेही सोयीचे होते, पण यावेळी प्रशासकीय पातळीवरूनही पदवीधरांना आवाहन करून नोंदणी करून घेण्यात आली आहे. या मतदारांपर्यंत पोहोचणे हे उमेदवाराला मोठे आव्हान असेल.

सर्वच पक्ष इच्छुक

  • या मतदारसंघाचे विद्यमान आमदार म्हणून भाजपकडून निरंजन डावखरे यांचे नाव चर्चेत आहे. विद्यमान आमदार आमचा असल्याने ही जागा आमचीच, अशी भाजपची भूमिका आहे.
  • गतवेळी येथे भाजपसमोर शिवसेनेचा उमेदवार होता. ते संजय मोरे आता शिंदेसेनेत आहेत. त्यामुळे महायुतीमधून शिंदेसेना या जागेसाठी दावा करत आहे.
  • लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा दिला, तरी मनसेने एकही जागा लढवलेली नाही. त्यामुळे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महायुतीने मनसेला संधी द्यावी, अशी मागणीही केली जात आहे.
  • महाविकास आघाडीतून काँग्रेसकडून या जागेसाठी दावा केला जात आहे. कोकणात उद्धवसेनाच सगळ्या जागा लढत आहे. त्यात काँग्रेसला संधी मिळालेली नाही. त्यामुळे ही जागा काँग्रेसला सोडावी, अशी अपेक्षा केली जात आहे.
  • गतवेळी आघाडीकडून राष्ट्रवादीचा उमेदवार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसलाही ही जागा हवी आहे.
  • भाजपला टक्कर देत गतवेळी शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे महाविकास आघाडीतून उद्धवसेनाही या जागेसाठी इच्छुक आहे. कदाचित उमेदवार तुमचा, पण जागा आमची अशी शक्कल उद्धवसेनेकडून लढवली जाण्याची शक्यता आहे.

ठाण्याचे प्राबल्यया मतदारसंघातील १ लाख ७७ हजार मतदारांमध्ये ७३ हजारांहून अधिक मतदार ठाणे जिल्ह्यात आहेत. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतही हेच होते. त्यामुळे साहजिकच या जागेसाठी ठाण्यातील उमेदवाराला प्राधान्य दिले जाते. रायगड जिल्ह्यात ४५ हजारांहून अधिक मतदार आहेत. रत्नागिरीत जिल्ह्यात २१ हजारांहून अधिक, तर पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० हजारांपेक्षा कमी मतदार आहेत. पुरवणी मतदार यादी बनवण्याचे काम सुरू असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. ठाणे येथे अधिक मतदार असल्याने सर्वच पक्ष ठाण्यातील उमेदवाराला प्राधान्य देतात.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणVidhan Parishadविधान परिषदMLAआमदार