संदीप बांद्रेचिपळूण : नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी महाविकास आघाडी व महायुतीचा गटही फुटला. अशाही परिस्थितीत भाजप - शिंदेसेनेने युतीचा धर्म पाळला. मात्र, काँग्रेसने आघाडीची साथ साेडल्याने आघाडीचा किल्ला गडगडल्याचे समाेर आले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील काही मुद्यांवर एकमत न झाल्याने त्याचा फटका शहरातील सहा प्रभागातील उमेदवारांना बसला. महायुतीत आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष अलिप्त राहिल्याने दोन प्रभागातील युतीच्या उमेदवारांना फटका बसला.जिल्ह्यातील सर्वाधिक चुरशीची लढत चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीत झाली. नगरसेवक पदाच्या २८ जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधीपासूनच महायुती व महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. परंतु, निवडणूक जवळ येताच प्रत्येक राजकीय पक्षात स्वबळाच्या हालचाली सुरू झाल्या. शेवटच्या क्षणी महायुतीतून काही राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष वेगळा झाला, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतून काँग्रेस बाजूला झाली.त्यातच आमदार भास्कर जाधव व माजी आमदार रमेश कदम यांनी हातमिळवणी करत त्यांनीही काही उमेदवारांची स्वतंत्र मोठ बांधून वेगळी वाट धरली. तसेच माजी खासदार विनायक राऊत यांनी ऐनवेळी परस्परविरोधी भूमिका घेतली. नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे हक्काच्या जागा काही मतांच्या फरकाने गमवाव्या लागल्याचे समाेर आले आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) व उद्धवसेना एकत्रित लढली असती, तर आणखी सहा जागा जिंकता आल्या असत्या. याच पद्धतीने राष्ट्रवादी (अजित पवार) सोबत असती, तर महायुतीलाही मतांच्या आकडेवारीनुसार आणखी दोन जागा जिंकता आल्या असत्या. संबंधित उमेदवारांनी नेत्यांकडे आधीच आघाडीतील एक अर्ज मागे घेण्यासाठी शेवटच्या टप्प्यात तगादा लावला होता. मात्र, त्याची पक्ष व नेत्यांनी वेळीच दखल न घेतल्याने निवडणूक निकालात त्याचे परिणाम दिसले.
Web Summary : Chipalun's local elections saw alliances collapse, costing Mahavikas Aghadi six seats and Mahayuti two. Internal disagreements and independent candidates impacted the results significantly, as key leaders took opposing stances.
Web Summary : चिपळूण के स्थानीय चुनावों में गठबंधन टूटने से महाविकास अघाड़ी को छह और महायुति को दो सीटों का नुकसान हुआ। आंतरिक असहमति और स्वतंत्र उम्मीदवारों ने परिणामों को प्रभावित किया, क्योंकि प्रमुख नेताओं ने विरोधी रुख अपनाया।