दारुड्याने आईला बांधावरून ढकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:33 IST2021-03-27T04:33:22+5:302021-03-27T04:33:22+5:30
देवरुख : मद्याच्या नशेत एका प्रौढाने आपल्या वृद्ध आईला बांधावरून ढकलून दिल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील सोनगिरी घुमाणेवाडी येथे घडली ...

दारुड्याने आईला बांधावरून ढकलले
देवरुख : मद्याच्या नशेत एका प्रौढाने आपल्या वृद्ध आईला बांधावरून ढकलून दिल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील सोनगिरी घुमाणेवाडी येथे घडली आहे. यात सुलोचना गणपत शिंदे (७०) या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी अशोक गणपत शिंदे याच्यावर देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद रामचंद्र शिंदे यांनी दिली आहे. सुलोचना शिंदे या घरात असताना त्यांचा मुलगा अशोक दारू पिऊन आला आणि त्यांच्याशी भांडण करू लागला. भांडणादरम्यान अशोकने सुलोचना यांना शिवीगाळ करून घरामागील उंच बांधावरून खाली ढकलून दिले. यामुळे सुलोचना यांच्या कपाळाला व नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. यात त्या जखमी झाल्या. त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
अशोकविरुद्ध देवरुख पोलीस स्थानकात भारतीय दंडविधान कलम ३३५, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल जावेद तडवी करीत आहेत.