हेगशेट्ये महाविद्यालयात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:30 IST2021-04-16T04:30:52+5:302021-04-16T04:30:52+5:30

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या येथील एस्. पी. हेगशट्ये महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ...

Dr. Hegshetye College. Greetings to Ambedkar | हेगशेट्ये महाविद्यालयात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

हेगशेट्ये महाविद्यालयात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या येथील एस्. पी. हेगशट्ये महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डाॅ. आंबेडकर जयंतीनिमित्त ऑनलाईन पद्धतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वामन सावंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार आणि कार्याचा आढावा घेतला. संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जलनीती, जलव्यवस्थापन आणि या संदर्भातील त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.

यावेळी ऑनलाईन पद्धतीने प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात अनघा जोशी हिने प्रथम, दीक्षा कांबळे हिने द्वितीय तर शीतल गावकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गाैरविण्यात आले. प्रास्ताविक प्रा. पौर्णिमा सरदेसाई यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुशील साळवी यांनी केले तर प्रा. डॉ. पूजा मोहिते यांनी आभार मानले.

Web Title: Dr. Hegshetye College. Greetings to Ambedkar