APMC Election Result: रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘सहकार पॅनल’चे वर्चस्व
By मेहरून नाकाडे | Updated: April 29, 2023 13:59 IST2023-04-29T13:58:53+5:302023-04-29T13:59:34+5:30
सहकार पॅनलमधून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, ठाकरे सेना असे सर्वच पक्ष एकत्र आले होते

APMC Election Result: रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘सहकार पॅनल’चे वर्चस्व
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत सर्व पक्षिय ‘सहकार पॅनल’ ने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद यश संपादन केले आहे. तीन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. तीन अपक्ष उमेदवारांचा पराभव झाला आहे.
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. बाजार समितीसाठी सहकार पॅनलमधून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, ठाकरे सेना असे सर्वच पक्ष एकत्र आले होते. मात्र, तीन अपक्ष उमेदवारांमुळे निवडणूक घ्यावी लागली. सहकार पॅनलचे हेमचंद्र माने (भाजप), गजानन पाटील (शिंदे सेना), सुरेश कांबळे (राष्ट्रवादी) हे तीन संचालक आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.
११ जागांसाठी झालेल्या निवडणूक निकालात अरविंद आंब्रे (राष्ट्रवादी) विजय टाकळे (राष्ट्रवादी), मधुकर दळवी (शिंदे सेना), नैनेश नारकर (ठाकरे सेना) रोहित मयेकर (शिंदे सेना), सुरेश सावंत (राष्ट्रवादी), संदीप सुर्वे (ठाकरे सेना), स्मिती दळवी (राष्ट्रवादी), स्नेहर बाईत (ठाकरे सेना), ओंकार कोलगे (शिंदे सेना), प्रशांत शिंदे (ठाकरे सेना) उमेदवार विजयी झाले आहेत.
ग्रामपंचायत स्तरावरील दोन जागांसाठी उमेदवारी अर्जच आला नव्हता व व्यापारी व अडते मधून एक जागेसाठी आलेला अर्ज छाननीत बाद झाल्याने तीन जागा रिक्त राहिल्या आहेत.