चिपळूण मुस्लिम विकास मंचातर्फे गोवळकोट येथे डॉक्टर आपल्या दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:30 IST2021-05-24T04:30:23+5:302021-05-24T04:30:23+5:30
अडरे : काेराेनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच या संस्थेने डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम ...

चिपळूण मुस्लिम विकास मंचातर्फे गोवळकोट येथे डॉक्टर आपल्या दारी
अडरे : काेराेनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच या संस्थेने डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम सुरू करून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. गोवळकोट येथे या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच ही संस्था सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर राहिली आहे. समाजातील गोरगरीब तसेच विधवा महिलांना मदत करून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी या संस्थेचे योगदान मोठे राहिले आहे. ताप, सर्दी, खोकला असलेले रुग्ण लवकर डॉक्टरांकडे न जाता घरातच उपचार घेतात. परिणामी जीवघेण्या परिणामांना सामोरे जावे लागते. तसेच साधा ताप असला तरी रुग्ण डॉक्टरकडे जाण्यास भीत आहेत, याची दखल तालुका मुस्लिम विकास मंचने हा उपक्रम हाती घेतला आहे.
डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम सुरू करून नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि मोफत औषधे या माध्यमातून दिली जात आहेत. चिपळूण शहरातील गोवळकोट येथे या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच चिपळूणचे अध्यक्ष अन्वरभाई पेचकर, कार्याध्यक्ष ॲड. ओवेस पेचकर, सचिव हनीफ चौगुले, उपाध्यक्ष सदू पटेल, शकील परकार, सदस्य मजहर पेचकर मोईन पेचकर, मुशर्रफ पेचकर, माहीर पेचकर तसेच डाॅ. आब्बास जबले व डाॅ. आमीना हनीफ चौगुले उपस्थित होते. चिपळूण तालुका मुस्लिम महिला विकास मंच चिपळूणतर्फे डाॅ. आमीना हनीफ चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.
----------------------------
चिपळूण मुस्लिम विकास मंचने सुरू केलेल्या डॉक्टर आपल्या दारी उपक्रमात नागरिकांची तपासणी करण्यात आली़