शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

कोकणी जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका; चंद्रकांत पाटील यांनी कंत्राटदारांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 12:41 PM

कोकणातील रस्त्यांवरील सर्व खड्डे तातडीने बुजवणे, तसेच पावसाचा जोर पाहता अपघात टाळण्यासाठी अधिकार्‍यांना चोवीस तास सतर्क राहण्याचे आदेश दिले.

रत्नागिरी - मुंबई-गोवामहामार्गाच्या कामात आणखी गती आणून कामाचा दर्जा सुधारावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच कोकणी जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका. कोणाच्याही चुकांमुळे सामान्य जनतेला त्रास झाल्यास शासन अतिशय कडक कारवाई करेल, असे खडेबोल पाटील यांनी यावेळी कंत्राटदार व अधिकार्‍यांना सुनावले. 

गेले दोन दिवस मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रत्नागिरी व रायगड येथील रस्त्यांची आणि चिपळूण ते वडखळ या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाची पाहणी केली. यानंतर कंत्राटदारांच्या काही ठिकाणी अवलंबलेल्या ढिसाळ कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत, महामार्ग अधिकारी वर्गाने अधिक परिणामकारक व जातीने देखरेख करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी कोकणातील रस्त्यांवरील सर्व खड्डे तातडीने बुजवणे, तसेच पावसाचा जोर पाहता अपघात टाळण्यासाठी अधिकार्‍यांना चोवीस तास सतर्क राहण्याचे आदेश दिले. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात उभारण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण बोगद्याच्या कामाची देखील यावेळी मंत्री पाटील यांनी पाहणी केली. 

यावेळी महामार्गाच्या बांधकामाची कामाची गती वाढवून डिसेंबर २०१९ पर्यंत संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर किमान दोन मार्गिका वाहतूक सूरू करण्यासाठी नियोजनबध्द कार्यवाही करावी, अशा सक्त सूचना कंत्राटदारांना व महामार्ग अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कोकणातील जनतेच्या संयमाचा अंत न पाहता, चौपदरीकरणाचे संपूर्ण काम डिसेंबर २०२० पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झालेच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश दिले. 

कोकणवासियांनी सहकार्य करावेदरम्यान, मुंबई-गोवा महामार्ग हे सर्व कोकणवासियांचे कित्येक वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात येत असून  कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास जलद आणि सुरक्षित करण्यासाठी या कामात आतापर्यंत कोकणवासियांनी संयम दर्शवून चांगले सहकार्य केले आहे, याबद्दल आम्ही आभारी आहोत. सदर महामार्ग चौपदरीकरणासाठी सर्व यंत्रणा अहोरात्र कष्ट करत असून, असेच सहकार्य यापुढे ही कोकणवासियांनी करण्याचे आवाहन मंत्री पाटील यांनी यावेळी केले. 

तसेच, अधिकार्‍यांनी देखील जबाबदारीचे भान राखून व कोकणवासियांना विश्वासात घेऊन अतिशय संवेदनशीलपणे काम करावे, अन्  चाकरमान्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी प्रयत्नशील राहण्याचे निर्देश दिले. अधिकारी, कंत्राटदार आणि कोकणवासियांच्या परस्पर सहकार्य व सामंजस्याने हा राष्ट्रीय महामार्ग लवकरच पूर्णत्वास जाईल, अशी मला पक्की खात्री आहे असे मंत्री पाटील यांनी सांगितले. 

वडखळ बायपास पूल लवकर पूर्ण करण्याचे निर्देशपेण-वडखळ-अलिबाग या मार्गावर नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी होत असते, ही समस्या दूर करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाअंतर्गत बायपास पूल उभारण्यात येत असून, यापैकी पूर्ण झालेल्या पुलाच्या एका मार्गिकेची मंत्री पाटील यांनी आज NHAI अभियंत्यासमवेत पाहणी केली. सुमारे ३.५० किमी अंतराच्या या बायपास पुलामुळे पेण-वडखळ-अलिबाग दरम्यानच्या वाहतूक कोंडीची समस्या कायमची दूर होणार असून, कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. या पुलाच्या पाहाणीनंतर दुसरी मार्गिका देखील जलदगतीने पूर्ण करुन हा पूल लवकरात लवकर प्रवाशांसाठी खुला करा, असे निर्देश मंत्री पाटील यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिले.

कशेडी घाटातील प्रवास होणार जलद व सुरक्षित मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा कशेडी घाट हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या घाटातील धोकादायक वळणांमुळे अनेक जीवघेण्या अपघाताच्या घटना घडतात. या दुर्घटना टाळण्यासाठी आणि चाकरमान्यांचा प्रवास कमी वेळात, सुखकर व सुरक्षित करण्यासाठी १.८० आणि १.९० किमीचे दोन स्वतंत्र बोगदे बनविण्याचे काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्ग