अवैध धंद्यावर जिल्हाभर पोलिसांचे छापासत्र सुरु, ५ आरोपींना विविध ठिकाणी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:07 PM2020-10-09T12:07:57+5:302020-10-09T12:12:46+5:30

police, raids, illegal, ratnagirinews, crimenews, रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांनी अवैध धंद्याविरुध्द कारवाईची जोरदार मोहीम सुरु केली आहे़ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात अवैध धंद्यावर ठिकठिकाणी छापा टाकून लाखोंचा माल जप्त केला असून, पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे़

District police raids on illegal trade started, 5 accused arrested at various places | अवैध धंद्यावर जिल्हाभर पोलिसांचे छापासत्र सुरु, ५ आरोपींना विविध ठिकाणी अटक

अवैध धंद्यावर जिल्हाभर पोलिसांचे छापासत्र सुरु, ५ आरोपींना विविध ठिकाणी अटक

Next
ठळक मुद्देहजारो रुपयांची हातभट्टीची दारु जप्त पोलीस अधीक्षक डॉ़ मोहितकुमार गर्ग यांच्या आदेशानुसार कारवाई

रत्नागिरी : जिल्ह्यात पोलिसांनी अवैध धंद्याविरुध्द कारवाईची जोरदार मोहीम सुरु केली आहे़ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात अवैध धंद्यावर ठिकठिकाणी छापा टाकून लाखोंचा माल जप्त केला असून, पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे़

जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यावर सर्वसामान्य जीवन पूर्वपदावर आल्यानंतर अवैध धंदे तेजीत सुरु होण्यास सुरुवात झाली आहे़, याची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांत ठिकठिकाणी अवैध धंद्याविरुध्द जोरदार मोहीम सुरु केली आहे़

देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावनदी किनारी जंगलमय भागात परशुराम वाडी येथील रामकृष्ण धोंडू याने सुरु केलेल्या हातभट्टी दारु भट्टीवर छापा टाकून ५,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन त्याला अटक केली़ तसेच रत्नागिरी शहराजवळी सोमेश्वर येथे शहर पोलिसांनी छापा टाकून केतन जयसिंग पिलणकर याला अटक करुन त्याच्याकडून १,७६६ रुपयांची विविध प्रकारची अवैध दारु जप्त केली़

रत्नागिरी शहर पोलिसांनी मिरजोळे पाटीलवाडी येथे सुरेश रामचंद्र पारकर याच्या ताब्यातून २,२०० रुपये किंमतीची ४० लीटर हातभट्टीची दारु जपत करुन त्याला अटक केली़. पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेर्वी, महादेववाडी येथे दीपक एकनाथ खरडे याला अटक करुन त्याच्याकडून ७१५ रुपयांची गावठी दारु जप्त केली़ . चिपळूण पोलिसांनी पागनाका येथे पॉवर हाऊसच्या मागे छापा टाकून ७५० रुपयांची दारु जप्त केली़ त्याचबरोबर सुचिता सुरेश सावंत या महिलेला अटक केली़.

Web Title: District police raids on illegal trade started, 5 accused arrested at various places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.