डेरवण येथे रंगणार जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:34 IST2021-09-18T04:34:19+5:302021-09-18T04:34:19+5:30
खेड : महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने टेबल टेनिस असोसिएशन ऑफ रत्नागिरी यांच्यातर्फे जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन ...

डेरवण येथे रंगणार जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा
खेड : महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने टेबल टेनिस असोसिएशन ऑफ रत्नागिरी यांच्यातर्फे जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २५, २६ व २७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेमध्ये ११, १३, १५, १७, १९ वर्षांखालील मुलगे आणि मुलींच्या वयोगटांचा समावेश आहे. ११ वर्षांखालील गटात १ जानेवारी २०११ नंतर जन्मलेले, १३ वर्षांखालील गटात १ जानेवारी २००९ नंतर जन्मलेले, १५ वर्षांखालील गटात १ जानेवारी २००७ नंतर जन्मलेले, १७ वर्षांखालील गटात १ जानेवारी २००५ नंतर जन्मलेले, १९ आणि १५ व १९ वर्षांखालील गटासाठी वैयक्तिक / सांघिक असे सामने घेतले जातील. प्रत्येक गटातील पहिल्या दोन क्रमांकाच्या स्पर्धकांना पदक देण्यात येणार आहेत. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत २२ सप्टेंबर ठेवण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिली टेबल टेनिस स्पर्धा असल्याने सर्व खेळाडूंनी यात भाग घ्यावा. त्यातून खेळाडूंना राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी प्राप्त होईल, असे आवाहन स्पर्धेचे आयोजक अजित गालवणकर यांनी केले आहे. तसेच डेरवण येथील क्रीडा संकुलातर्फे लवकरच प्रशिक्षणाच्या सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंना पुढच्या स्पर्धेसाठी त्याचा उपयोग होईल. या स्पर्धेत इच्छुक खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.