शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत 24 फेब्रुवारीपासून जिल्हा कृषि महोत्सव व पशु-पक्षी प्रदर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 14:26 IST

महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत प्रमोद महाजन क्रीडा संकुल ( रत्नागिरी )येथे जिल्हा कृषी महोत्सव व पशु-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरी -  महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत प्रमोद महाजन क्रीडा संकुल ( रत्नागिरी )येथे जिल्हा कृषी महोत्सव व पशु-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शेतक-यांना शासनाच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती देणे, संशोधन कृषि तंत्रज्ञान व प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, धान्य व खाद्य महोत्सवाद्वारे थेट विक्रीला चालना देणे, यासाठी राज्यातील ३४ जिल्ह्यात दरवर्षी पाच दिवसांचा जिल्हा कृषि महोत्सव साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यासाठी प्रतिजिल्हा १४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आंबा आणि काजू प्रक्रियेचे स्वतंत्र दालन प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. खते, कीटकनाशके व बियाणी यांचे दालन उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, धान्य महोत्सव बचत गटांच्या उत्पादनाची विक्री व प्रदर्शन, शेतकरी यंत्र व अवजारे दालन, विविध जातींच्या पशु-पक्ष्यांचे प्रदर्शन यांसारखे एकूण २०० स्टॉल प्रदर्शनाच्या निमित्ताने मांडण्यात येणार आहेत. प्रदर्शनाचे औचित्य साधून तालुक्यातील प्रत्येकी दोन मिळून एकूण १८ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कृषीविषयक परिसंवाद व चर्चासत्र तसेच विक्रेता व खरेदीदार संमेलन भरविण्यात येणार आहे. रत्नागिरी येथे कार्यरत असणा-या एक्झॉटिक कंपनीचे दालन प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. फळप्रक्रिया करणारी ही कंपनी असून, प्रक्रियेसाठी लागणारा ८० टक्के आंबा परराज्यातून विकत घेते. यावर्षीपासून जिल्ह्यातील आंबा विक्रीला घेण्याची सूचना कंपनीला केली जाणार आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या आंब्याला चांगला भाव देण्यात यावा, अशी मागणी केली जाणार असल्याचे आमदार सामंत यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रात बर्ड फ्लूची लागण झालेली नाही. कर्नाटक व अन्य राज्यात याचा प्रसार झाला आहे, अशी माहिती पशु विभागातर्फे देण्यात आली. यावेळी विभागीय कृषी अधिकारी आरीफ शहा, जिल्हा उपविभागीय कृषी अधीक्षक एस. एस. जगताप उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी