पालवण येथील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:34 IST2021-09-22T04:34:59+5:302021-09-22T04:34:59+5:30
अडरे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती जमाती विभाग प्रदेश समन्वयक सुनील सावर्डेकर यांच्या माध्यमातून चिपळुणातील ग्रामीण भागातील महाविद्यालयीन ...

पालवण येथील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
अडरे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती जमाती विभाग प्रदेश समन्वयक सुनील सावर्डेकर यांच्या माध्यमातून चिपळुणातील ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फोल्डरचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार, पालवण येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फोल्डर वाटप करण्यात आले.
काँग्रेसचे नेते सुनील सावर्डेकर यांनी चिपळुणातील अनुसूचित जाती-जमाती विभागातील विद्यार्थ्यांसाठी ३ हजार फोल्डर वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यानुसार, या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वी कळवंडे बौद्धवाडी, कातळवाडी, रोहिदासवाडी, कोलेखाजण येथील विद्यार्थ्यांना फोल्डरचे वाटप करण्यात आले, तर आता पालवण येथील विद्यार्थ्यांना फोल्डरचे वाटप करण्यात आले. यावेळी रोहिदास समाज उत्कर्ष महासंघ अध्यक्षा स्मिता सावर्डेकर, मधुकर सावर्डेकर, चंद्रकांत पेवेकर, प्रकाश पवार, अनंत जाधव, श्रीराम सावर्डेकर, प्रवीण सावर्डेकर, दीपक सावर्डेकर उपस्थित होते.