घाटीवळे करंजारी युवा मंडळातर्फे साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST2021-06-16T04:41:57+5:302021-06-16T04:41:57+5:30

देवरुख : घाटीवळे - करंजारी (ता. संगमेश्वर) येथील युवा मंडळातर्फे घाटीवळे व करंजारी गावांमध्ये मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात ...

Distribution of literature by Ghativale Karanjari Youth Circle | घाटीवळे करंजारी युवा मंडळातर्फे साहित्य वाटप

घाटीवळे करंजारी युवा मंडळातर्फे साहित्य वाटप

देवरुख : घाटीवळे - करंजारी (ता. संगमेश्वर) येथील युवा मंडळातर्फे घाटीवळे व करंजारी गावांमध्ये मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले़ यावेळी आराेग्याच्या सुरक्षेविषयी माहिती देणारी पत्रकेही वाटण्यात आली़

सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील सर्व लोकांपर्यंत मदतीचा हात पुढे व्हावा, यासाठी मंडळातील सर्व सदस्य कार्यरत आहेत. मदतीच्या व आपुलकीच्या भावनेतून सर्व घाटीवळे - करंजारीतील ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझर व सुरक्षेविषयी माहिती देणारी पत्रके प्रत्यक्ष ग्रामस्थांच्या घरी जाऊन वाटप करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नाझीम फोडकर, उपाध्यक्ष संतोष मावळणकर, सचिव मितेश शेणवी व मंडळातील सर्व सदस्यांनी सहकार्य केले़ यापुढेही अशाच समाजोपयोगी कार्यक्रमांतर्गत समाजापर्यंत घाटीवळे- युवा मंडळ लोकांपर्यंत पोहचेल याची ग्वाही दिली.

------------------------

संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे - करंजारी येथील युवा मंडळातर्फे घराेघरी साहित्याचे वाटप करण्यात आले़

Web Title: Distribution of literature by Ghativale Karanjari Youth Circle