बामणाेलीतील ग्रामस्थांना पत्र्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:31 IST2021-05-23T04:31:34+5:302021-05-23T04:31:34+5:30
देवरुख : तौक्ते चक्रीवादळाने नजीकच्या बामणोली गावात अनेक घरांवरील पत्रे उडाले व अनेक घरांचे नुकसान झाले आहे़ त्या ...

बामणाेलीतील ग्रामस्थांना पत्र्याचे वाटप
देवरुख : तौक्ते चक्रीवादळाने नजीकच्या बामणोली गावात अनेक घरांवरील पत्रे उडाले व अनेक घरांचे नुकसान झाले आहे़ त्या नुकसानाची पाहणी करून आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सिमेंट पत्र्याचे वाटप करण्यात आले़
संगमेश्वर तालुका युवक अध्यक्ष पंकज पुसाळकर, तालुका उपाध्यक्ष नितीन भोसले, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, युवक विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नीलेश भुवड, बामणोली माजी सरपंच किसन राणे, मुरादपूर सरपंच मंगेश बांडागळे यांच्यातर्फे सिमेंट पत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बामणोलीचे पोलीस पाटील अमोल प्रभावळकर, बामणोलीचे सरपंच वैष्णवी विजय शिंदे, उपसरपंच शिरीष दळवी, शाखाप्रमुख शांताराम जंगम, युवक तालुका उपाध्यक्ष ओमकार गायकवाड, बामणोलीचे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत जाधव, ग्रामपंचायत सदस्या सविता शिंदे, कविता सुतार, नित्यानंद देसाई उपस्थित होते.
घरावरील पत्र्यांचे नुकसान झालेल्या सीताराम शिंदे, मधुकर बेटकर, तुकाराम शिंदे, अमृता बेटकर, विठोबा बेटकर, गंगाराम भिसे, संतोष शिंदे, हरिश्चंद्र गुरव, विष्णू मोरे, शिरीष दळवी, चंद्रकांत जाधव, शांताराम सकपाळ, शशिकांत शिंदे, अनंत राणे, यशवंत जाधव, प्रदीप जाधव यांना सिमेंट पत्र्याचे वाटप करण्यात आले़