वेळवंड कोठारवाडीत येथे खते, बियाणांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:31 IST2021-05-23T04:31:25+5:302021-05-23T04:31:25+5:30

रत्नागिरी : कोरोना काळात शेतकरी घरी आहेत; मात्र पेरणीसाठी बियाणे व खतांची आवश्यकता भासत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय भासू ...

Distribution of fertilizers and seeds at Velvand Kotharwadi | वेळवंड कोठारवाडीत येथे खते, बियाणांचे वाटप

वेळवंड कोठारवाडीत येथे खते, बियाणांचे वाटप

रत्नागिरी : कोरोना काळात शेतकरी घरी आहेत; मात्र पेरणीसाठी बियाणे व खतांची आवश्यकता भासत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय भासू नये यासाठी रत्नागिरी तालुका कृषी कार्यालयातर्फे शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर खते व बियाणांचे वाटप करण्यात येत आहे. तालुक्यातील वेळवंड कोठारवाडी येथील शेतकऱ्यांना ६२० क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले.

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व तयारी व वेळेची बचत व्हावी यासाठी कृषी विभागाकडून निविष्ठांचे वाटप करण्यात येत आहे. याचबरोबर रोहिणी पंधरवड्यांतर्गत भात बियाणे, बीजप्रक्रिया, तसेच बियाणे उगवण क्षमता चाचणी ही प्रात्यक्षिके वाडीवार आयोजित करण्यात येत आहेत.

शेतकऱ्यांच्या शेतीशाळेच्या माध्यमातून कोरोना संसर्गाचे शासकीय नियमांचे पालन करण्यात येत आहे. शिवाय सर्व शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती दिली जात आहे. यावेळी मंडल कृषी अधिकारी जयेश काळोखे, कृषी पर्यवेक्षक डवरी उपस्थित होते.

--------------------------

वेळवंड कोठारवाडी येथे शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर खते, बियाणांचे वाटप मंडल कृषी अधिकारी जयेश काळोखे, कृषी पर्यवेक्षक डवरी यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Distribution of fertilizers and seeds at Velvand Kotharwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.