शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेला दुजाभावाची वागणूक : सिंधुदुर्गला ८० डॉक्टर, तर रत्नागिरीला शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 18:07 IST

शासकीय रूग्णालयांमध्ये वेलनेस क्लिनिकअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० बीएएमएस डॉक्टर्सची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये अपुरी संख्या असतानाही एकाही डॉक्टरची भरती करण्यात येणार नाही.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेला दुजाभावाची वागणूक : सिंधुदुर्गला ८० डॉक्टर, तर रत्नागिरीला शून्यवेलनेस क्लिनिकमधून रत्नागिरी जिल्हा दूरच

रहिम दलाल

रत्नागिरी : शासकीय रूग्णालयांमध्ये वेलनेस क्लिनिकअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० बीएएमएस डॉक्टर्सची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये अपुरी संख्या असतानाही एकाही डॉक्टरची भरती करण्यात येणार नाही. त्यामुळे शासनाकडून रत्नागिरी जिल्हा परिषदेला दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तुटवडा असल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत असल्याची ओरड जिल्हाभरात सुरु आहे. त्यासाठी डॉक्टर्सची भरती लवकरात लवकर करावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे.

डॉक्टर्स कमी असल्याप्रकरणी अनेकदा जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेतही जोरदार चर्चा झाली. या मागणीचे ठराव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे पाठविण्यात आलेले आहेत. तरीही शासनाकडून या मागणीची दखल घेतली जात नसून आरोग्याचा खेळ सुरु आहे.ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त पदांमुळे त्याचा भार केवळ ९१ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आहे. ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शासनाकडील ६३ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.

रत्नागिरी जिल्हा डोंगराळ आहे. त्याचबरोबर बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्र गावापासून दूर आहेत. त्याचबरोबर या प्राथमिक आरोग्य केंंद्रांच्या शेजारीच त्यांच्या निवासाची सोय करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना राहावे लागते. त्यामुळे अनेक वैद्यकीय अधिकारी अर्धवट सेवा करुन ते निघून गेले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी पुढाकार घेतल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १६ हजार रुपयांच्या मानधनावर २८ बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. ते आजही कार्यरत आहेत. काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना दोन-दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सेवा बजवावी लागते. त्यामुळे रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांमुळे कार्यरत असलेल्यांची तारांबळ उडते.

वेलनेस क्लिनिक योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येत आहे. या योजनेमध्ये राज्यातील १७ जिल्हे घेण्यात आले आहेत. त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० डॉक्टरांची लवकरच भरती करण्यात येणार आहे. मात्र रत्नागिरीचा या योजनेत समावेशच करण्यात आलेला नाही.रत्नागिरी जिल्ह्याचा समावेशच नाहीरत्नागिरी जिल्हा वेलनेस क्लिनिकमध्ये घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या योजनेतून एकही डॉक्टर भरण्यात येणार नसल्याने रत्नागिरी जिल्ह्याची झोळी रिकामीच राहणार आहे. त्यामुळे शासनाचा जिल्ह्यातील रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरु असून रत्नागिरी जिल्हा परिषदेबाबत दुजाभाव होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यdocterडॉक्टरzpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी