शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडियावरील फसवणूक प्रकार रत्नागिरीत उघड, भेटवस्तू पाठवण्याचा बहाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 14:01 IST

परदेशी नागरिक असल्याचे भासवताना किंमती वस्तू भेटवस्तू म्हणून पाठवण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करण्याचा एक अनोखा फंडा सध्या सोशल मिडियावर विशेष करून फेसबुकवर सुरु आहे. रत्नागिरीत उघडकीस आलेल्या तवंगर जमादार झारी (आदमपूर, रत्नागिरी) यांच्या फसवणुकीवरून त्यामध्ये काहीजण फसले गेल्याचेही दिसून आले आहे.

ठळक मुद्देसोशल मिडियावरील फसवणूक प्रकार रत्नागिरीत उघडपरदेशी नागरिक असल्याचे भासवत किंमती भेटवस्तू पाठवण्याचा बहाणा

विहार तेंडुलकर

रत्नागिरी : परदेशी नागरिक असल्याचे भासवताना किंमती वस्तू भेटवस्तू म्हणून पाठवण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करण्याचा एक अनोखा फंडा सध्या सोशल मिडियावर विशेष करून फेसबुकवर सुरु असून त्यामध्ये काहीजण फसले गेल्याचेही रत्नागिरीत उघडकीस आलेल्या तवंगर जमादार झारी (आदमपूर, रत्नागिरी) यांच्या झालेल्या फसवणुकीवरून दिसून आले असून या प्रकरणात एक टोळकेच सामील असावे, असा कयास काढला जात आहे.

झारी यांच्यासोबतच शहरातील एका नागरिकालाही असाच अनुभव आला असून मात्र तो वेळीच सावध झाल्याने त्याची आर्थिक फसवणूक टळली. तवंगर जमादार झारी यांची ज्या तरूणीने फसवणूक केली, त्या तथाकथित प्रिस्का विल्यम्स हीची आणखी एक फेसबुक प्रोफाईल असून ती या प्रोफाईलवर मेरी जॉन्सन स्मिथ (लंडन) या नावाने कार्यरत आहे. या दोन्ही प्रोफाईलवरील फोटो हा एकच आहे. या दोन्ही अकाऊंटवरून नागरिकांना मैत्रीचे नाटक करून फसवणुकीसाठी जाळ्यात ओढले जात आहे.

याबाबत फसवणूक टळलेल्या नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, जाळ्यात ओढतानाही पध्दतशीरपणे आणि आपल्याबाबत गैरसमज होणार नाहीत, अशा पध्दतीने ओढले जाते. तुमच्यामुळे मला नोकरीत बढती मिळाली म्हणून मी आपल्यावर खूष होऊन महागड्या भेटवस्तू देत आहे, असे मेरी नावाच्या या तरूणीने सांगितले. त्यानंतर महागड्या वस्तू खरेदी केल्याचे सांगून त्याचे फोटो, वस्तूचे पॅकिंग, एवढेच नव्हे तर कुरिअर केल्याची पावतीही पाठवली.

ज्या दिवशी कुरिअर भारतात पोहोचणार, त्याच दिवशी आपल्याला फोन आला आणि त्यांनी कुरिअर कंपनीच्या बँक खात्यात २६ हजार ५०० रुपये भरल्यावर आपले कुरिअर घरपोच केले जाईल, असे सांगण्यात आले. मात्र आधीपासूनच सावध असलेल्या या नागरिकाने आपण आपले पार्सल पोहोच झाल्यानंतरच आपण पैसे भरू, असे सांगितले. मात्र तत्पूर्वी त्याने त्या कुरिअरचा अकाऊंट नंबर टिपून घेतला.या अकाऊंटची माहिती घेतली असता फोन करणारी कुरिअर कंपनी दिल्लीतून फोन केल्याचे भासवते आणि पैसे भरण्यासाठी दिलेला बँक अकाऊंट नंबर हा बेंगलोर येथील असल्याचे दिसून आले. त्यामुळे फसवणुकीची पाळेमुळे ही अनेक ठिकाणी पसरली असल्याचे दिसून येते. यामागे एक टोळी कार्यरत असल्याचे मत व्यक्त होत असून त्यामुळेच या सर्व गोष्टी पध्दतशीरपणे आणि कोठेही समोरच्या व्यक्तीला फसवणूक होईपर्यंत संशय येणार नाही, अशा पध्दतीने हाताळल्या जातात, असे म्हटले जात आहे.

मेरी नावाच्या एका मुलीने जे पार्सल रत्नागिरीतील नागरिकाला पाठवले होते, त्या नागरिकाने सांगितले की, त्याला कुरिअर कंपनीकडून पंजाब बँकेचा इंदिरा नगर शाखेचा १२६८०००१०१६१२४०२ हा अकाऊंट नंबर देण्यात आला. कुरिअरमधून आलेला कॉल हा ९५८२६०४८५० या मोबाईलवरून आला होता, असे या नागरिकाने सांगितले.समज-गैरसमज१) परदेशातून येणारा कोणताही माल हा कस्टम खात्याच्या तपासणीनंतरच दिला जातो. कोणतीही कुरिअर कंपनी अकाऊंटमध्ये पैसे भरण्यास सांगत नाही. कस्टम खात्यातही हे पार्सल सर्वांसमक्ष फोडून आतील मालाचे मूल्यांकन केले जाते आणि त्यानंतर त्यावर कस्टम ड्यूटी आकारली जाते.२) परदेशातून बोलणारी तरूणी ही व्हॉटस्अ‍ॅप नंबर हा परदेशी असल्याचे भासवते. परंतु हा व्हॉटस्अ‍ॅप नंबर परदेशात कार्यान्वित केला जातो आणि त्याचा वापर मात्र भारतात केला जातो. त्यामुळे या परदेशी नंबरवर अनेकवेळा कॉलही होत नाही.३) तरूणीकडून केलेला व्हिडिओ कॉलही बनावट असतो. हा कॉल रेकॉर्ड करून आपल्या कॉलवेळी मोबाईलसमोर ठेवला जातो. या कॉलही केवळ काही सेकंदाचाच असतो. आपण बिझी असल्याचे सांगून हा फोन कट केला जातो. 

टॅग्स :fraudधोकेबाजीSocial Mediaसोशल मीडियाRatnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी