शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: टीडब्ल्यूजे घोटाळ्यातील संशयित संचालकाला चिपळुणात अटक, मुख्य संशयित अजूनही फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:33 IST

पाच दिवसांची पाेलिस काेठडी

चिपळूण : हजारो कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करून वर्षभरापासून फरार असलेला टीडब्ल्यूजे कंपनीचा संचालक संकेश घाग याचा शाेध घेण्यात पाेलिसांना यश आले आहे. रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि चिपळूण पाेलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत त्याला मंगळवारी चिपळुणातून अटक केली. मात्र, अद्याप मुख्य संशयित अजूनही पाेलिसांच्या हाती लागलेला नाही.टीडब्ल्यूजे कंपनीच्या माध्यमातून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी नव्हे, तर हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक उकळण्यात आली होती. मात्र, ठरलेल्या कालावधीनंतर ना परतावा मिळाला, ना मूळ रक्कम. त्यानंतर कंपनीचे एमडी समीर नार्वेकर, संचालक अचानक गायब झाले आणि गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक झाल्याचे उघड झाले.टीडब्ल्यूजेच्या गुंतवणूकदारांनी वेळोवेळी आंदोलन, मोर्चे, निवेदने देत न्यायासाठी आवाज उठवला. मात्र, दीर्घकाळ कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पैसे मिळण्याची आशा धूसर झाली हाेती. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पाेलिस आणि चिपळूण पोलिसांनी तपासाला गती देत संकेश घाग याला शोधून काढले आणि अटक केली. टीडब्ल्यूजे घोटाळ्यातील ही अटक महत्त्वाची मानली जात असून, पुढील तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

आणखी माहिती उघड हाेणार?टीडब्ल्यूजे घाेटाळ्यात आणखी कोणकोण सामील आहेत, कंपनीच्या आर्थिक व्यवहारांचा नेमका मागोवा काय आहे, तसेच फसवणूक केलेली रक्कम कुठे गुंतवण्यात आली, याची माहिती उघड हाेण्याची शक्यता आहे. पाेलिसांच्या तपासाला आता गती मिळणार आहे.

न्यायालयाच्या परिसरात गर्दीसंकेश घाग याच्या अटकेचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरताच चिपळूण न्यायालयाच्या परिसरात गुंतवणूकदारांनी मोठी गर्दी केली होती. अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेला हा संशयित पोलिसांच्या सततच्या शोधमोहिमेनंतर अखेर हाती लागला.

पाच दिवसांची पाेलिस काेठडीसंशयित संकेश घाग याला चिपळूण न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे. त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : TWJ Scam: Suspect Arrested in Chiplun, Main Accused Still at Large

Web Summary : A director of TWJ Company, wanted in a multi-crore fraud, has been arrested in Chiplun. The main suspect remains absconding. Investors were duped with promises of high returns. Police investigation continues to uncover more details about the scam and involved parties.