धनंजय कुलकर्णी रत्नागिरीचे नवे पोलीस अधीक्षक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 22:58 IST2022-10-20T22:58:14+5:302022-10-20T22:58:25+5:30
रखडलेल्या पोलीस बदल्यांना अखेर गुरुवारी मुहूर्त मिळाला. रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकपदी धनंजय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली असून, विद्यमान पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांना अद्यापही नवीन नियुक्ती देण्यात आलेली नाही.

धनंजय कुलकर्णी रत्नागिरीचे नवे पोलीस अधीक्षक
रत्नागिरी :
रखडलेल्या पोलीस बदल्यांना अखेर गुरुवारी मुहूर्त मिळाला. रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकपदी धनंजय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली असून, विद्यमान पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांना अद्यापही नवीन नियुक्ती देण्यात आलेली नाही.
आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या दुसऱ्या यादीत यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. नूतन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी चिपळूणमध्ये उपविभागीय पाेलीस अधिकारी म्हणून काम केले आहे. ते रत्नागिरीचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे यांच्या बॅचमधील आहेत.
राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी सायंकाळी गृह विभागातर्फे काढण्यात आले. आस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले धनंजय कुलकर्णी यांची नियुक्ती रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. गेले दोन वर्ष रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मोहितकुमार गर्ग कार्यरत होते.