धामणदेवी शाळेचा आर्यन बहुतले राज्यस्तरावर दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST2021-04-06T04:29:44+5:302021-04-06T04:29:44+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : जिल्हा परिषद आदर्श शाळा, धामणदेवी नं. १ या शाळेचा विद्यार्थी आर्यन संजय बहुतले याने ...

Dhamandevi School's Aryan Bahutle is second in the state | धामणदेवी शाळेचा आर्यन बहुतले राज्यस्तरावर दुसरा

धामणदेवी शाळेचा आर्यन बहुतले राज्यस्तरावर दुसरा

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण

: जिल्हा परिषद आदर्श शाळा, धामणदेवी नं. १ या शाळेचा विद्यार्थी आर्यन

संजय बहुतले याने ‘डेरवण युथ गेम्स’ या राज्यस्तरीय

स्पर्धेमध्ये योगासन या खेळामध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये दुसरा

क्रमांक पटकावला आहे.

लॉकडाऊन काळातही हा विद्यार्थी आपला सराव नियमित करीत होता. या विद्यार्थ्याला शाळेचे

क्रीडा शिक्षक व योगा मार्गदर्शक संतोष दत्ताराम जाधव यांनी मार्गदर्शन

केले आहे. शाळेतील शनिवारचा योगासनांचा सराव मला खूप उपयोगी पडला, असे आर्यनने आपले मत व्यक्त केले आहे. या स्पर्धेसाठी ७ जिल्ह्यातील १२० खेळाडूंनी योगा खेळात सहभाग घेतला होता. आर्यनला कोवॅस व्यायाम शाळेतील प्रशिक्षक सुहास मनोहर पवार यांचेही मार्गदर्शन

मिळाले आहे. या यशाबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Web Title: Dhamandevi School's Aryan Bahutle is second in the state