शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
4
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
5
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
6
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
7
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
8
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
9
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
10
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
11
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
12
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?
13
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
14
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
15
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
16
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
17
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
18
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
19
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
20
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO

देवरूखे ब्राह्मण जागतिक परिषद डिसेंबरमध्ये रत्नागिरीत, देवरुखेंची गणनाही होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 16:22 IST

महाराष्ट्रासह देश - विदेशातील सर्व देवरूखे ब्राह्मण समाजाचे आकर्षण असणारी आगामी देवरुखे ब्राह्मण जागतिक परिषद १५ व १६ डिसेंबर रोजी रत्नागिरीत होणार आहे.

ठळक मुद्देदेवरूखे ब्राह्मण जागतिक परिषद डिसेंबरमध्ये रत्नागिरीत, देवरुखेंची गणनाही होणारराज्यासह देश - विदेशातील सर्व देवरुखे ब्राह्मण समाजबांधव उपस्थित राहणार

रत्नागिरी : महाराष्ट्रासह देश - विदेशातील सर्व देवरूखे ब्राह्मण समाजाचे आकर्षण असणारी आगामी देवरुखे ब्राह्मण जागतिक परिषद १५ व १६ डिसेंबर रोजी रत्नागिरीत होणार आहे.देवरूखे ब्राह्मण परिषदेच्या नियोजनासाठी आढावा बैठक रत्नागिरीमध्ये घेण्यात आली. या सभेत सामाजिक भावनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. देवरूखे ज्ञाती बांधव उत्स्फूर्तपणे या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले होते.या बैठकीत कार्यकर्त्यांना जागतिक परिषदेनिमित्त प्रकाशित केलेले निवेदन, जाहिरात फॉर्म, प्रवेश तिकिटे, पोस्टर्स, पोस्ट कार्ड इत्यादी गोष्टींचे सभासदांना वितरण करण्यात आले. जागतिक परिषदेची रूपरेषा व गठीत केलेल्या कार्यकारी समित्यांच्या कामांचा आढावाही यावेळी घेण्यात आला.

या परिषदेनिमित्त विविध सर्वांगिण उद्दिष्ट निश्चित करण्यात आली असून, सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींचा सहभाग व मार्गदर्शन यानिमित्ताने लाभणार आहे.तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेशही या परिषदेत असणार आहे. ही परिषद यशस्वी करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार कृतिशील पावले उचलण्यात येत आहेत. परिषदेच्या निमित्ताने सर्व देवरुखे जनांची गणना केली जात आहे. त्यासाठीhttp://members.devrukhebrbrahman.com/Registration.php या संकेतस्थळावर जाऊन प्रत्येक ज्ञातीबांधवांनी त्यावर आपली नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.या बैठकीला जागतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर, रत्नागिरी देवरूखे संघाचे अध्यक्ष विनोद जोशी, परिषदेचे कार्यवाह सुरेश शितूत, सतीश शेवडे, राजू भाटलेकर, रामकृष्ण तायडे, सतीश काळे यांच्यासह विद्यार्थी सहाय्यक संस्थेचे व सर्व देवरूखे संस्थांचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.भैरीबुवाला साकडे घालूनजागतिक परिषदेचे निमंत्रण व प्रवेशिका वितरणाची सुरूवात रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी देवाचे आशीर्वाद घेऊन करण्यात आले. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे उपस्थित होते. आतापासून या परिषदेबाबतचा प्रसार सुरू झाला आहे.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRatnagiriरत्नागिरी