शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मिरकरवाडा बंदरावर ३९ कोटींची विकासकामे : मंत्री नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:34 IST

रत्नागिरी : अतिक्रमणमुक्त मिरकरवाडा मत्स्य बंदरावर प्राधान्याने संरक्षक भिंत बांधण्याची कार्यवाही करावी. त्याचबरोबर मच्छीमारांसाठी निवारा शेड, गीअर शेड, प्रशासकीय ...

रत्नागिरी : अतिक्रमणमुक्त मिरकरवाडा मत्स्य बंदरावर प्राधान्याने संरक्षक भिंत बांधण्याची कार्यवाही करावी. त्याचबरोबर मच्छीमारांसाठी निवारा शेड, गीअर शेड, प्रशासकीय कार्यालय, उपाहारगृह, प्रसाधनगृह, अशी विकासकामे करण्याच्या सूचना देतानाच साखरीनाटेसह अन्य सागरी किनाऱ्यांवर अतिक्रमण असल्यास, ती हटविण्याबाबत नोटीस द्याव्यात, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरेमंत्री नितेश राणे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी (दि.८) बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मत्स्यव्यवसाय विभागाचे कोकण प्रादेशिक उपायुक्त नागनाथ भादुले, सहायक आयुक्त सागर कुवेसकर, मत्स्यविकास अधिकारी आनंद पालव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते.मंत्री नितेश राणे यांनी मिरकरवाडा अतिक्रमणमुक्त केल्याबद्दल मत्स्यव्यवसाय विभाग आणि पोलिस विभागाचे सर्वप्रथम विशेष अभिनंदन केले. ते म्हणाले की, अतिक्रमणमुक्त जागेवर मच्छीमारांच्या सुविधांसाठी शासनाच्या ३९ कोटी निधीतून विकासात्मक कामे करण्यावर भर द्या. औद्योगिक प्रकल्पातून, तसेच अन्य मार्गाने येणाऱ्या सांडपाण्याबाबत संबंधितांना नोटीस द्यावी.मिरकरवाडा अतिक्रमण निर्मूलन पॅटर्नप्रमाणेच साखरीनाटेसह अन्य किनारपट्टीवर अतिक्रमणे असतील, तर संबंधितांना स्वत:हून ती काढून घेण्याबाबत नोटीस द्यावी. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डानेही अतिक्रमण काढण्याबाबत कार्यवाही करावी. अतिक्रमण निर्मूलन झाल्याने विकासाचा मार्ग मोठा झाला आहे. मत्स्योत्पादन वाढीसाठी केलेल्या उपाययोजनांवर अभ्यास, मच्छीमार प्रशिक्षण, ४१ तलावांबाबत अभ्यास करून अहवाल देणे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर मत्स्योत्पादन वाढ, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.उपायुक्त नागनाथ भादुले यांनी यावेळी मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्प टप्पा क्र. १ मध्ये घेण्यात आलेली कामे, टप्पा क्र. २ मध्ये करण्यात येणारी कामे याबाबत सविस्तर माहिती दिली, तसेच नियमांचा भंग करणाऱ्या स्थानिक नौकांकडून ४ लाख ८० हजार रुपयांची वसुली केल्याबाबत आणि परप्रांतीय नौकेला ११ लाख रुपये दंडाची नोटीस बजाविल्याबाबतही माहिती दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNitesh Raneनीतेश राणे