मागणी असूनही फणस उपेक्षितच!

By Admin | Updated: March 30, 2015 00:24 IST2015-03-29T22:20:01+5:302015-03-30T00:24:40+5:30

बाजारपेठच नाही : प्रक्रिया करुन बाजारात स्थान नसल्याने नाराजी

Despite the demand, the wings neglected! | मागणी असूनही फणस उपेक्षितच!

मागणी असूनही फणस उपेक्षितच!

फुणगूस : कोकणी मेव्यावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग येथे उदयास येत असताना सर्वत्र मुबलक असणाऱ्या फणसाला मागणी असूनही चांगली बाजारपेठ मिळू शकत नाही हे आश्चर्यच म्हणावे लागेल. तरी महिला बचतगटांनी फणसापासून बनवण्यात येणाऱ्या उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असा विचार पुढे येत आहे.
कोकणी मेवा म्हटल की आंबा, काजू, कोकम, करवंद, जांभूळ, फस आदी फळे डोळ्यासमोर तरळू लागतात. या मेव्यावर प्रक्रिया करणारे उद्योग कोकणात सुरु होत आहेत. आंबा, काजूप्रमाणे रातांबा, करवंदे, जांभळे यांनाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठा काबीज करण्यास सुरुवात केली आहे. यात फणसाची मात्र उपेक्षाच दिसून येत आहे. कोकणात दारोदारी फणसाची झाडे दिसून येतात. प्रत्येक झाडावर फणस लगडलेले दिसून येतात. वरुन काटेरी असणारे हे फळ आतून अत्यंत रसाळ तसेच चविष्ट असते. कापा आणि बरका अशा दोन जातींमध्ये फणस असतात. कापा या फणसाला सर्वसाधारण मागणी असते, तर बरका हा अत्यंत रसाळ असून, त्यापासून फणसपोळी, साटं आदी पदार्थ बनवले जातात. कापा फणसापासून तळलेले गरे बनवले जातात. या पदार्थांना कोकणातच नव्हे; तर बाहेरही चांगली मागणी आहे.
मुंबई-पुण्याहून चाकरमानी गावी आले की, त्यांना निरोप देताना बरोबर फणस द्यायची पद्धत आहे. फणस उत्पादन विपूल असूनही त्यावरील प्रक्रिया उद्योगाना येथे चालना मिळालेली नाही. ती मिळावी, अशी शेतकरी मागणी करत आहे.
कोणत्या भावाने त्याची विक्री करतो, याची कल्पना स्थानिक शेतकऱ्यांना नसते. बऱ्याचदा फणस कुजून गेल्याचे अगर खराब झाल्याचे सांगून शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली जाते. ही फसवणूक टाळण्यासाठी फणसाच्या विक्रीचे योग्य नियोजन हवे. फणसावर आधारित प्रक्रिया उद्योग येथे उभारल्यास आंबा, काजूप्रमाणे फणसालाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणे शक्य होईल.
बचत गटांनीही पापड, लोणचे, चकल्या आदी एकाच प्रकारची उत्पादने बनवू नयेत. फणसापासून फणसपोळी, तळलेले गरे, साट आदी पदार्थांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. (वार्ताहर)


कोकणातील आंबा , काजूला पर्याय ठरू शकेल असे फणसाचे प्रक्रिया उद्योग.
कोकण म्हटलं की करवंद, कोकम याची आठवण.
बाजारपेठेत भाव वधारणार.
फणसापासून तळलेले गरे ापा, यांचे मार्केटिंग आवश्यक.
काजूप्रमाणे फणसाला ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ हवी.
पदार्थांची विक्री व्यवस्था उभारणे गरजेचे.
फणसाच्या विविध जाती संशोधनाची गरज.
ग्रामीण भागात असणाऱ्या या पिकाला बाजारभाव हवा.
कोकण प्रक्रिया उद्योगाने फणसाचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा.


राज्य सरकारच्या ग्रामविकास माध्यमातून कोकणी मेव्याचा प्रक्रिया उद्योगांमध्ये समावेश करताना फणसाची नोंद अशा पिकांमध्ये करण्याची मागणी होत आहे.
डोंगरावर पिकणारे अवीट गोडीचे हे फळ आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गाजवण्याचा विश्वास.
विद्यापीठाच्या कृषी संशोधन विभागाने फणस पिकावर प्रयोग करुन त्यातून उत्तम जात विकसित करावी, यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.

Web Title: Despite the demand, the wings neglected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.