शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दादांनी दिलेला शब्द त्यांच्या अर्धांगिनीने पाळला, आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला लावली उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 15:58 IST

आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला येण्याचे आश्वासन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते

चिपळूण : आमदार शेखर निकम यांची कन्या मुक्ता हिचा विवाह अक्षय शिंदे याच्याशी सावर्डे येथे शुक्रवारी पार पडला. या विवाह सोहळ्याला येण्याचे आश्वासन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. नियतीने दादांना हिरावून नेले. मात्र, त्या शब्दाची शान राखत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दुःख पचवत स्वतः उपस्थित राहून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!या विवाह सोहळ्याला उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, आनंदराव अडसूळ, आमदार भास्कर जाधव, प्रकाश सुर्वे, योगेश सागर, माजी आमदार राजन साळवी, अनिकेत तटकरे, वैभव नाईक, सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते, तसेच मराठी अभिनेते संजय खापरे, प्रभाकर मोरे, क्रिकेट प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनीही उपस्थिती लावली हाेती.अक्षता पडल्यावर काही वेळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विवाहस्थळी दाखल झाल्या. त्या स्टेजवर येताच आमदार निकम यांच्या पत्नी पूजा निकम यांनी त्यांना मिठी मारली; त्याक्षणी दोन्ही कुटुंबांतील स्नेहबंधांचा भावनिक आविष्कार सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. उपमुख्यमंत्री पवार यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा देत आशीर्वाद दिले. मात्र, त्यांनी इतरांकडून औपचारिक शुभेच्छा स्वीकारणे टाळले.याप्रसंगी ज्येष्ठ चित्रकार प्रकाश राजेशिर्के यांनी त्यांना चित्र भेट दिले. यावेळी अनिरुद्ध निकम, प्रशांत निकम, सई निकम-सुर्वे, डॉ. तानाजी चोरगे यांच्यासह निकम कुटुंब उपस्थित होते. दादांचा शब्द, सुनेत्रा पवारांची उपस्थिती आणि दोन कुटुंबांतील जिव्हाळा या सर्वांनी सावर्डेतील विवाह सोहळा भावनांनी ओथंबलेला एक संस्मरणीय क्षण ठरला.स्मृतींना अभिवादनविवाह सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रथमच याठिकाणी आल्या हाेत्या. त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा स्पष्ट दिसत होती, तरीही त्यांनी आवर्जून स्व. गोविंदराव निकम यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले आणि कुटुंबीयांशी संवाद साधला.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's promise fulfilled: Sunetra Pawar attends Nikam's daughter's wedding.

Web Summary : Sunetra Pawar honored her late husband Ajit Pawar's promise by attending MLA Shekhar Nikam's daughter's wedding. Despite her grief, she blessed the couple, showcasing strong family bonds. Ministers and celebrities also attended the emotional ceremony in Savarde.