शहरं
Join us  
Trending Stories
1
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
2
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
3
शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य?
4
इथे २०२५ नाही, २०१८ आहे, सूर्योदय १२ वाजता होतो; ज्वालामुखीची राख याच देशातून भारतात आली
5
स्त्रियांसाठी स्वतःचेच घर बनलेय सर्वात धोकादायक ठिकाण! प्रत्येक १० मिनिटाला महिलेची जवळच्याच माणसाकडून झाली हत्या
6
Priyanka Chaturvedi: भाजलेल्या चण्यांमध्ये 'कर्करोगजन्य' विषारी केमिकल? प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र!
7
आयटी इंजिनिअर नोकरी गमावली, होम लोनचा हप्ता भरण्यासाठी थेट रॅपिडो ड्रायव्हर बनला!
8
गाड्यांच्या सुरक्षेसाठी 'भारत NCAP 2.0' नियम लवकरच लागू; 'क्रॅश टेस्ट' आता कठीण...
9
'जुबिन गर्ग यांची हत्या झाली!'; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सिंगापूर मृत्यू प्रकरणावर धक्कादायक दावा
10
GST नंतर आता कर्जही होणार स्वस्त? RBI लवकरच रेपो दरात कपात करण्याची शक्यता; गव्हर्नर म्हणाले..
11
“सत्ताधाऱ्यांची विधाने म्हणजे सत्तेची गुर्मी, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही?”: वडेट्टीवार
12
IND vs SA 2nd Test : द.आफ्रिकेनं ठेवलं अशक्यप्राय लक्ष्य! टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान
13
“मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदरला पूर्ण क्षमतेने सूर्या योजनेचा जल पुरवठा सुरू होणार”: सरनाईक
14
धक्कादायक! 'गुप्त रोग' बरे करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने ४८ लाखांना फसवलं; इंजिनीअरची किडनीही फेल 
15
हाय-डिमांड नोकऱ्यांची लिस्ट आऊट! या २५ फील्डमध्ये पडणार पगाराचा जोरदार पाऊस!
16
महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
17
सेलिना जेटलीचा पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, ५० कोटींसह मागितला घटस्फोट
18
"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
19
"सरकार कोणाचेही असो, मानसन्मान पाळायलाच पाहिजे"; सुप्रिया सुळेंची CM-DCM वर टीका
20
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत येत्या रविवारी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन, सत्ता बदलानंतर पहिला मेळावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 19:02 IST

आमदार उदय सामंत हे शिंदे गटात दाखल झाल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच मेळाव्यात शिवसैनिक शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता

रत्नागिरी : राज्यातील सत्ता बदलानंतर येत्या रविवारी, (दि. १०)  प्रथमच रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेचा मेळावा आयाेजित करण्यात आला आहे. रत्नागिरी शहरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात हाेणाऱ्या या मेळाव्याला खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी, संपर्कप्रमुख सुधीर मोरे उपस्थित राहणार आहेत. तर आमदार उदय सामंत हे शिंदे गटात दाखल झाल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच मेळाव्यात शिवसैनिक शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.शिवसेनेतील बंडाळीत रत्नागिरी विधानसभेचे आमदार उदय सामंत सहभागी झाल्यामुळे आता खासदार विनायक राऊत, उपनेते आमदार राजन साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने पुन्हा एकदा उभारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर दि. १० जुलै रोजी शिवसेनेच्या रत्नागिरी तालुक्याचा मेळावा आयाेजित करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणानुसार मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिवसेनेच्या सर्व शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, सरपंच यांनी शिवसैनिकांसह मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या मेळाव्यात आमदार राजन साळवी यांची शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांच्यासह सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे यांनी केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना