शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

रेमडेसिवरची मागणी आता केवळ ३४ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 5:41 PM

Coronavirus Unlock Ratnagirinews- ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होऊ लागली आहे. आरोग्य विभागाकडून चाचण्या वाढविण्यात आल्याने तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे केल्याने रुग्णांचे निदान वेळेवर होत आहे. परिणामी उपचारासाठी रुग्ण वेळेवर दाखल होत आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने आता जिल्हा रुग्णालयात रेमडेसिवर इंजेक्शनची मागणी केवळ २३ टक्के तर जिल्ह्यात एकूण ३४ टक्के इतकी आहे.

ठळक मुद्देरेमडेसिवरची मागणी आता केवळ ३४ टक्केच ऑक्क्टोबरपासून जिल्ह्यात रुग्णांची संख्या घटली

शोभना कांबळेरत्नागिरी : ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होऊ लागली आहे. आरोग्य विभागाकडून चाचण्या वाढविण्यात आल्याने तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे केल्याने रुग्णांचे निदान वेळेवर होत आहे. परिणामी उपचारासाठी रुग्ण वेळेवर दाखल होत आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने आता जिल्हा रुग्णालयात रेमडेसिवर इंजेक्शनची मागणी केवळ २३ टक्के तर जिल्ह्यात एकूण ३४ टक्के इतकी आहे.जिल्ह्यात गणेशोत्सवानंतर कोरोना रूग्णांची संख्या भरमसाठ वाढली. या उत्सवासाठी आलेल्यांपैकी अनेक जण तपासणी न करताच घरी गेल्याने गंभीर रूग्णांचे प्रमाण वाढले. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कोरोनाची रूग्णसंख्या वेगाने वाढून गंभीर रूग्णांचे प्रमाणही वाढले. लोक लक्षणे लपवू लागल्याने उशिरा उपचारासाठी दाखल होऊ लागले. त्यामुळे रूग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले.गंभीर रूग्ण वाढताच जिल्हा रूग्णालयाला रेमडेसिवर इंजेक्शनचा साठा मोठ्या प्रमाणावर ठेवावा लागत होता. सुरूवातीला जिल्हा रूग्णालयाला रेमडेसिवर इंजेक्शन ५६०० रूपयांना एक याप्रमाणे खरेदी करावे लागले. सप्टेंबरमध्ये रूग्णसंख्या वाढल्याने या इंजेक्शनचीही गरज वाढली. मात्र, आता दिवसाला १० पेक्षाही कमी झाली आहे.ॲंटिजेन टेस्ट, औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्धऑगस्ट महिन्यात महिला रूग्णालय, जिल्हा कोरोना रूग्णालय आणि इतर शासकीय रूग्णालयांमध्ये ५६२ रेमडेसिवर इंजेक्शन लागली. मात्र, सप्टेंबर महिन्यात भरमसाठ वाढलेल्या रूग्णांबरोबरच गंभीर रूग्ण वाढले. त्यामुळे ही संख्या १२२० इतकी झाली. वेळेवर निदान होऊ लागल्याने गंभीर रूग्णांची संख्याही घटली आहे. मात्र, रेमडेसिवर इंजेक्शनबरोबरच ॲटिजेन टेस्टसह इतर औषधसाठा जिल्हा रूग्णालयात पुरेशा प्रमाणात ठेवण्यात आला आहे.१० इंजेक्शनची गरजरेमडेसिवर इंजेक्शन कोरोनावर उपयोगी नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्याचवेळी जिल्ह्यात कोरोनाची रूग्ण घटल्याने जिल्हा रूग्णालयाने इंजेक्शनची खरेदी थांबविली. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक १२२० इंजेक्शने लागली. मात्र, आता दिवसाला १० पेक्षा कमी इंजेक्शने लागत आहेत.

कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असली तरीही अजून कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यासाठी रेमडेसिवर इंजेक्शन तसेच सर्व चाचण्या, औषधसाठा मुबलक प्रमाणात ठेवलेला आहे. नागरिकांनीही कोरोना गेला असे न समजता अजूनही काही महिने मास्क आणि सामाजिक अंतर आदी नियमांचे पालन करावे.- डॉ. संघमित्रा फुले-गावडे,जिल्हा शल्य चिकीत्सक

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकhospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी