पावसाचा जोर कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST2021-09-15T04:37:11+5:302021-09-15T04:37:11+5:30
रत्नागिरी : साेमवारी रात्रीपासून वाढलेला पावसाचा जोर मंगळवारी काहीसा कमी झाला आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या गेल्या २४ तासांच्या अहवालानुसार ...

पावसाचा जोर कमी
रत्नागिरी : साेमवारी रात्रीपासून वाढलेला पावसाचा जोर मंगळवारी काहीसा कमी झाला आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या गेल्या २४ तासांच्या अहवालानुसार जिल्ह्यात ३८६.२० (सरासरी ४२.९१) मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.
सप्टेंबर महिन्यात पावसाने जोरदार ‘कम बॅक’ केले आहे. त्यामुळे सध्या पावसाच्या सरी जून-जुलै महिन्यात पडणाऱ्या पावसासारख्या कोसळत आहेत. गेल्या सहा-सात दिवसांपासून पाऊस सरींवर असला तरी जोरदार सरी कोसळत आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सात-आठ तारखेला पावसाने या दोन दिवसांत जवळपास २५० मिलिमीटरची सरासरी नोंदविली आहे.
सोमवारी रात्रीही पावसाचा जोर होता. मंगळवारी सकाळीही जोरदार सरी कोसळल्या. मात्र, अकरा वाजल्यापासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला. सायंकाळनंतर मात्र जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वाटत होती.