शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत वर्षभरात गुन्ह्यांमध्ये घट, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णींनी दिली माहिती

By शोभना कांबळे | Updated: January 22, 2025 19:24 IST

आर्थिक गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान

रत्नागिरी : २०२३-२४ या वर्षापेक्षा २०२४-२५ या आर्थिक वर्षात २३८ गुन्हे घटले आहेत. घटलेल्या गुन्ह्यांमध्ये घरफोडी, चोरी, दंगा, आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. क्युआर कोडद्वारे पेट्रोलिंग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्यांमध्ये घट होण्यात मदत झाली असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.जिल्हा पोलिस दलाच्या वर्षभराच्या कामगिरीचा आढावा पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी पत्रकारांसमोर मांडला. ते म्हणाले की, यावर्षी क्युआर कोडद्वारे पेट्रोलिंग या योजनेमुळे गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. खासगी व्यावसायिक आणि सरकारी आस्थापना यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार खासगी ३१२१ कॅमेरे बसविण्यात आले. त्यामुळे एकूण १३८८ दाखल गुन्ह्यांपैकी ११२१ गुन्हे उघड होण्यास मदत झाली असून, ८० टक्के गुन्हे उघड झाले आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाचे प्रयत्न असल्याचे सांगितले.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरजखासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आराेपीचा पाठपुरावा करण्यासाठी, त्याचा माग काढण्यासाठी, शोध घेण्यासाठी तसेच चेहरेपट्टीची ओळख पटविण्यासाठी मदत होते. तसेच तांत्रिक बाबींची उकल होण्यास मदत होते. गुन्ह्यांचे प्रमाण अधिक घटण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे प्रमाण वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चिपळूण आणि दापोली या शहरांमध्ये स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत डीपीडीसीकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याची तांत्रिक मंजुरी मिळालेली आहे आणि लवकरच या दोन्ही शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील आणि तिथेसुद्धा रत्नागिरीसारखे सीसीटीव्हीचे जाळे उभारले जाईल, असेही ते म्हणाले.

आर्थिक गुन्हेगारी रोखणे मोठे आव्हानआर्थिक गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून, त्यासाठी सातत्याने जिल्हा पोलिस दल जनजागृतीपर कार्यक्रमांवर भर देत आहे. यात काही आरोपी परराज्यात, तर काही परदेशात राहून गुन्हेगारी करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, हाच महत्त्वाचा मार्ग आहे. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत असतो, असेही पोलिस अधीक्षक यांनी सांगितले. तसेच गुन्ह्यांमध्ये आरोपीचा माग काढण्यासाठी डाॅग स्काॅडचा महत्त्वाचा उपयोग होत असल्याचे पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी