गणपतीपुळेतील श्रीला हापूस आंब्यांची आरास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 13:51 IST2020-05-23T13:49:03+5:302020-05-23T13:51:31+5:30
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात कोकणातील फळांचा राजा हापूस आंब्याची आरास मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी केली.

गणपतीपुळेतील श्रीला हापूस आंब्यांची आरास
ठळक मुद्देगणपतीपुळेतील श्रीला हापूस आंब्यांची आरासफुले, मोदक, पणत्या आदी विविध प्रकारे सजावट
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात कोकणातील फळांचा राजा हापूस आंब्याची आरास मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी केली.
श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे नेहमीप्रमाणे पहाटे मंदिर उघडून श्रींची पूजाअर्चा अभिषेक होऊन आरती करण्यात येते. मंदिरात फुले, मोदक, पणत्या आदी विविध प्रकारे सजावट व आरास करण्यात येते.
शुक्रवार, २२ रोजी पहिल्यांदाच श्रीला कोकणचा राजा हापूस आंब्याची सजावट व आरास मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी केली. लॉकडाऊन काळात मंदिर बंद असल्याने ही सजावट व आरास भक्तांना पाहता आली नाही. मात्र, या आरासामुळे मूर्ती विलोभनीय दिसत होती.