शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दापोली तालुक्यातील युवकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 5:24 PM

दापोली : तालुक्यातील टेटवली येथील पंकज कदम या युवकाचा सर्पदंश झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातिल डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी ...

ठळक मुद्देडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दापोली तालुक्यातील युवकाचा मृत्यू मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी नातेवाईकांनी घेतली भूमिका

दापोली : तालुक्यातील टेटवली येथील पंकज कदम या युवकाचा सर्पदंश झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातिल डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता ,तसेच जोपर्यंत डॉक्टरांवर सदस्य जोपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती.याबाबत सविस्तर वृत्त असे की टेटवली गावातील मळेकर वाडी येथील पंकज कदम या युवकाला मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास विषारी सर्पदंश झाला हा साप चावल्यानंतर पंकज याने स्वतः साप मारून भावंडांना उठवले व भावंड व काका यांच्या मदतीने दापोली शहरातील उपजिल्हा रुग्णालय गाठले मात्र येथे आल्यानंतर चार तास झाले तरी डॉक्टर तपासणीसाठी उपस्थित झाले नाही यानंतर एक डिलिव्हरीची केस पाहण्यासाठी डॉक्टर आले असता त्यांनी पंकज जी अत्यवस्थ अवस्था पाहून त्याला तातडीने येथून हलवा असे नातेवाइकांना सांगितले यानंतर नातेवाईकांनी शहरातील एका खाजगी दवाखान्यात त्याला तपासून पुढे चिपळूण येथील डेरवण रुग्णालय गाठले परंतु तोपर्यंत पंकजचा दुर्दैवी मृत्यू ओढवला होता या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी सायंकाळपर्यंत दापोली पोलिस स्थानकासमोर हे आंदोलन केले होते , रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम दापोली पोलिस स्थानकात सुरू होते , वैद्यकीय अधीक्षक डॉ शिवानंद चव्हाण यांनी हलगर्जी पणाचा अहवाल दिल्याने सात वाजता नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयातून बुधवारी रात्री 10 वाजता प्रेत बाहेर काढले , व टेटवली गावी घेऊन गेले , टेटवली गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले .पंकज उत्कृष्ट कबड्डीपटू कुमार.पंकज मनोज कदम इयत्ता दहावी या विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने आकस्मित आज दिनांक 21 ऑगस्ट 2019 रोजी डॉक्टरांचे योग्य उपचार न झाल्यामुळे मृत्यू झाला , असे प्रथम दर्शनी आढळून आल्याने बोलले जात आहे , परंतु पोलीस तपासात सत्य काय आहे ते उघड होईल .. डॉ. विश्राम रामजी घोले हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वाकवली चे माननीय मुख्याध्यापक व सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी पंचक्रोशीतील पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली शाळेने एक उत्कृष्ट कबड्डीपटू व आदर्श विद्यार्थी गमावला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी