विद्यार्थ्यांसाठी फाॅर्म १७ भरण्यासाठी मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:33 IST2021-09-18T04:33:54+5:302021-09-18T04:33:54+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२२ या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावी परीक्षेसाठी ...

विद्यार्थ्यांसाठी फाॅर्म १७ भरण्यासाठी मुदत
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२२ या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या फॉर्म नं. १७ भरून परीक्षेला बसण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही माहिती कोकण विभागीय मंडाळाचे सचिव डॉ.शिवलिंग पटवे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नावनोंदणी गुरुवार दिनांक १६ सप्टेंबर, २०२१ ते मंगळवार दि. १२ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत आहे. विद्यार्थ्यांनी शुक्रवार १७ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार दि. १४ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत मूळ अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी अर्ज, शुल्क जमा केल्याची पोच पावती, दोन छायाचित्र व मूळ कागदपत्रे जवळच्या केंद्र शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करावेत. त्याचप्रमाणे, केंद्र शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने प्राप्त झालेले अर्ज सोमवार दि. १८ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करण्यात यावे.
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in, व बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करून भरण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.