आईच्या चितेला मुलीने दिला मुखाग्नी, संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 01:15 PM2021-02-12T13:15:05+5:302021-02-12T13:17:24+5:30

Women Ratnagiri- पोटी चार मुली असल्याने मृत्यूनंतर आईच्या निधनानंतर अंत्यविधी करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला. पण, मुलीने थेट स्मशानभूमीत जाऊन आईच्या चितेला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावातील या घटनेने वंशाला दिवाच हवा, असे म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.

The daughter gave a mukhagni to the mother's cheetah, a type of temple at Sangameshwar taluka | आईच्या चितेला मुलीने दिला मुखाग्नी, संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील घटना

आईच्या चितेला मुलीने दिला मुखाग्नी, संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील घटना

googlenewsNext
ठळक मुद्देआईच्या चितेला मुलीने दिला मुखाग्नी, संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील प्रकारपतीच्या निधनानंतर मुलींचा सांभाळ, मुलींच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले

रत्नागिरी : पोटी चार मुली असल्याने मृत्यूनंतर आईच्या निधनानंतर अंत्यविधी करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला. पण, मुलीने थेट स्मशानभूमीत जाऊन आईच्या चितेला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावातील या घटनेने वंशाला दिवाच हवा, असे म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.

देवळेतील स्नेहलता माने यांचे वयाच्या ८०व्या वर्षी ३ फेब्रुवारीला निधन झाले. स्नेहलता यांना मुलगा नाही, तर चारही मुली. त्यातच स्नेहलता यांच्या पतीचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यानंतर पदरातील चार मुलींना स्नेहलता यांनी आधार देत लहानाचं मोठं केलं.

दरम्यान, ३ फेबुवारीला त्यांचे निधन झाले आणि मुलींच्या डोक्यावरील आईचे छत्रही हरपले. मुलगा नसल्याने या मातेला अग्नी देणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला. पण न डगमगता स्नेहलता यांची तीन नंबरची मुलगी सविता लाखाटे पुढे आली. स्मशानभूमीत जाऊन या मुलीने आईच्या अंत्यविधीचे सर्व कार्य पूर्ण केले.

समाज सुधारतोय
अंत्यसंस्कार करण्यासाठी तरी मुलगा हवाच, असे मानणारा समाज आता मुलींनी अंत्यसंस्कार करण्याच्या कृत्याचे समर्थन करत आहे, ही बाब नोंद घेण्याजोगी आहे.
 

Web Title: The daughter gave a mukhagni to the mother's cheetah, a type of temple at Sangameshwar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.