शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानाच्या मंदिरात विजेचा अंधार

By admin | Updated: July 26, 2015 00:01 IST

महावितरण : ८0 शाळांचा पुरवठा खंडित

रत्नागिरी : शाळांचे वीजबील भरण्यासाठी शासकीय निधीची तरतूद नसल्यामुळे जिल्ह्यातील ८० शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. एकीकडे शासन ‘ई’ लर्निंग प्रणालीची अमंलबजावणी करीत असताना दुसरीकडे मात्र विजेअभावी शाळेतील संगणक शोभेचे बाहुले बनले आहेत. ज्या ठिकाणी शिक्षणाव्दारे विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रकाशमय केले जाते, त्या शाळांमध्ये महावितरणच्या विजेने मात्र अंधार केला आहे. शासनाच्या चार टक्के सादील योजनेतंर्गत शाळांना निधी दिला जातो. त्यातून वीजबिल, पाणी बिल भरणे अशक्य होत आहे. पूर्वी शाळांना घरगुती दराने वीजपुरवठा करण्यात येत असल्याने शाळांना ३.३६ रूपये प्रतियुनिट दराने वीजपुरवठा करण्यात येत होता. मात्र आता शाळांना वाणिज्यिक दराने वीजपुरवठा करण्यात येत असल्यामुळे शाळांना प्रति युनिट ५.३८ पैसे दराने विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे वाढीव वीज बील भरणे शाळांना अशक्य झाले आहे. दैनंदिन शालेय जीवनापासून संगणकाचे ज्ञान मिळावे, यासाठी सर्व शाळा संगणकीकृत करण्यात आल्या आहेत. शिवाय ई लर्निंगचे धडेही विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. जिल्ह्यात २७४६ प्राथमिक शाळा असून ८० शाळांचा वीजपुरवठा बील न भरल्यामुळे खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान देण्यासाठी आणलेले संगणक शोभेच्या बाहुल्याप्रमाणे कोपऱ्यात धूळ खात पडले आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतून ई-लर्निग उपक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र विजेअभावी हा उपक्रमापासून ८० शाळा वंचित राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांची गळती सुरू आहे. पालकांचाही खासगी शाळांकडे वाढता कल आहे. शासन या शाळांतील विद्यार्थी गळती रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. असे असताना विजेचा प्रश्नदेखील शाळांपुढे उभा ठाकला आहे. यावर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन योग्य तोडगा काढावा, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांमधून होत आहे.(प्रतिनिधी)