महाआवास योजनेत दापोली तालुका दुसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:36 IST2021-09-15T04:36:27+5:302021-09-15T04:36:27+5:30
दापोली : प्रधानमंत्री आवास योजनेत कोकण विभागामध्ये दापोली तालुक्याने द्वितीय क्रमांक पटकावला असून, त्याचे पुरस्कार वाटप कोकणचे आयुक्त विलास ...

महाआवास योजनेत दापोली तालुका दुसरा
दापोली : प्रधानमंत्री आवास योजनेत कोकण विभागामध्ये दापोली तालुक्याने द्वितीय क्रमांक पटकावला असून, त्याचे पुरस्कार वाटप कोकणचे आयुक्त विलास पाटील यांच्या हस्ते झाले. नवी मुंबई येथे विभागीय आयुक्तालयात हा कार्यक्रम झाला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, दापोली पंचायत समितीच्या सभापती योगिता बांद्रे, गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
तालुक्यात महा आवास योजना अभियान काळात ३६७ प्रधानमंत्री आवास योजनेची घरे पूर्ण झाली आहेत. या अभियान काळामध्ये सर्व संपर्क अधिकाऱ्यांनी तालुक्यातील प्रत्येक लाभार्थ्यांची भेट घेऊन मार्गदर्शन केले व घरकुले पूर्ण करून घेतली. या अभियान काळामध्ये गवंडी प्रशिक्षण, घरकुल मार्ट, डेमो हाऊस, हे उपक्रमही राबविण्यात आले. तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी या लाभार्थ्यांना मार्गदर्शन करून वेळेवर घरकुलाच्या हप्त्याची मागणी करून मोठे योगदान दिले आहे.