शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरण: सदानंद कदम यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, ११ महिन्यांनी जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 12:15 IST

खेड : राज्यभर वादग्रस्त झालेल्या दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना सोमवारी सर्वोच्च ...

खेड : राज्यभर वादग्रस्त झालेल्या दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. ईडीने केलेल्या अटकेनंतर तब्बल ११ महिन्यांनंतर त्यांना जामीन मिळाला आहे.दापोली मुरूड येथे विविध नियमांचे उल्लंघन करून समुद्रकिनारी साई रिसॉर्ट बांधण्यात आल्याचा मुद्दा भाजपचे किरीट सोमय्या यांनी उचलला. त्यांनी याप्रकरणी तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांना लक्ष्य केले होते. ज्या वादग्रस्त रिसॉर्टवरून हा मुद्दा सुरू होता, ते अनिल परब यांनी सदानंद कदम यांना विकले होते. त्यामुळे ईडीने सदानंद कदम यांना १० मार्च २०२३ रोजी चार तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती. बेकायदा बांधकाम आणि संशयास्पद खरेदी-विक्री प्रकरणी ही कारवाई झाली.यापूर्वी ऑक्टोबर २०२३ मध्ये मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्या निर्णयाला कदम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने सुनावणी घेऊन निकाल १ डिसेंबरला राखून ठेवला होता. तो नंतर जाहीर करून कदम यांना दिलासा देण्यास नकार देण्यात आला होता.उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सदानंद कदम यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. अखेर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय