दापोलीत आईची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 16:50 IST2020-10-28T16:46:20+5:302020-10-28T16:50:39+5:30
suicide, crimenews, ratnagiri आपल्या आईने दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दापोली तालुक्यातील सोवेली येथे घडली. या घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली असून, या आत्महत्येचे नेमके कारण कळलेले नाही.

दापोलीत आईची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या
दापोली : आपल्या आईने दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दापोली तालुक्यातील सोवेली येथे घडली. या घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली असून, या आत्महत्येचे नेमके कारण कळलेले नाही.
सिद्धी ऊर्फ माधुरी प्रथमेश लाड (२६) असे या विवाहितेचे नाव असून, प्रणित (३ वर्षे), स्मित (२ वर्षे) अशी या दुर्दैवी मुलांची नवे आहेत. सोवेली गावातील चव्हाणवाडीत एका विहिरीत या महिलेने दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला.
या महिलेने घरगुती वादातून आत्महत्या केली की, अन्य कोणत्या कारणाने केली याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. ही घटना कळताच ग्रामस्थांनी गर्दी केली होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. याबाबत दापोली पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील या घटनेची माहिती घेत असून, पुढील कार्यवाही सुरु आहे.