शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Ratnagiri: बसने रस्ता सोडला, झाडाने जीव वाचवला; दाभोळ-मुंबई बसला शेनाळे घाटात अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:44 IST

मंडणगड : दापाेलीहून मुंबईच्या दिशेने निघालेली दाभाेळ - मुंबई एसटी बस रस्ता साेडून १५ फूट खाली घसरून पलटी झाल्याची ...

मंडणगड : दापाेलीहून मुंबईच्या दिशेने निघालेली दाभाेळ - मुंबई एसटी बस रस्ता साेडून १५ फूट खाली घसरून पलटी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री मंडणगड ते म्हाप्रळ मार्गावरील शेनाळे घाटात घडली. सुदैवाने ही बस झाडाला अडकल्याने रस्त्याशेजारील चिंचाळी धरणात काेसळता काेसळता वाचली. त्यामुळे बसमधील ४१ प्रवाशांचे प्राण वाचले.बसचालक व्ही. एस. गावडे हे दाभाेळ - मुंबई बस (एमएच १४, बीटी २२६५) घेऊन निघाले हाेते. या बसमध्ये वाहक मंदार भाेईर यांच्यासह ४१ प्रवासी हाेते. ही बस मंडणगड येथून निघाली असता, मध्यरात्री १:५५ च्या दरम्यान चिंचाळी धरणानजीक आली असता बसने रस्ता साेडला आणि १५ फूट बाजूला उलटली. सुदैवाने त्याचठिकाणी असणाऱ्या झाडाला बस अडकल्याने माेठा अनर्थ टळला. या अपघातात प्रवाशांना किरकाेळ दुखापत झाली आहे.या अपघातादरम्यान चाैक (ता. खालापूर, जि. रायगड) येथील मनोज थोरवे व त्यांचे सहकारी प्रवास करत हाेते. त्यांनी अपघात पाहिला आणि ते मदतीसाठी थांबलेे. तसेच मंडणगड येथील सचिन चव्हाण व गोठे गावातील जितेंद्र दवंडे हे एका रुग्णाला घेऊन या मार्गाने मुंबईला जात होते. चव्हाण यांनी थांबून गाडीत चढून प्रवाशांना बाहेर काढले. गाडीतील काही तरुण प्रवाशांनीही त्यांना मदत केली. त्याचबरोबर नगरसेवक मुश्ताक दाभीळकर यांनीही मदत करून जखमींना बाहेर काढले.या अपघाताची माहिती मिळताच मंडणगडचे पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय धुपकर, पोलिस हवालदार गणेश चव्हाण, पोलिस काॅन्स्टेबल सुहास मांडवकर, विशाल कोळथरकर, महेंद्र तांदळे, आकाराम माने यांनी मदतकार्यात सहभाग घेतला. जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेने मंडणगड ग्रामीण रुग्णालयात आणून प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.

संरक्षक भिंत गरजेचीसुमारे चार वर्षांपूर्वी याच ठिकाणावरून एक डंपर धरण क्षेत्रात कोसळून एका तरुणाचा जीव गेला होता. त्यामुळे याठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याची मागणी होत आहे.

यंत्रणांचे दूरध्वनी बंदया अपघाताची माहिती देण्याकरिता नागरिकांनी मंडणगड तहसील कार्यालय, पोलिस स्थानक व दवाखान्यात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तिन्ही ठिकाणचे फोन बंद हाेते. त्यामुळे आपत्तीच्या काळात नेमका संपर्क काेठे साधायचा, असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात