शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील पोलीसपाटलाची दबंगगिरी,  शेतकऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 14:30 IST

crimenews, chiplun, policepatil, ratnagirinews चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे - कुटलवाडी येथील एका शेतकऱ्याला गावच्या पोलीसपाटील प्रतिमा प्रभाकर गुजराथी व त्यांच्या दोन मुलांनी शेतात जनावरे गेल्याच्या रागातून मारहाण केली. यामध्ये हा शेतकरी जखमी झाला असून, त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

ठळक मुद्देपोलीसपाटीलसह मुलांविरोधात तक्रार दाखल जखमी शेतकऱ्यावर उपचार सुरू

चिपळूण : तालुक्यातील मुर्तवडे - कुटलवाडी येथील एका शेतकऱ्याला गावच्या पोलीसपाटील प्रतिमा प्रभाकर गुजराथी व त्यांच्या दोन मुलांनी शेतात जनावरे गेल्याच्या रागातून मारहाण केली. यामध्ये हा शेतकरी जखमी झाला असून, त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.अंकुश लक्ष्मण निवाते (३५, मुर्तवडे - कुटलवाडी) असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत निवाते यांनी फिर्याद दिली आहे. अंकुश निवाते हे पत्नी व मुलांसह ८ ऑक्टोबर रोजी घरी असताना सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला पोलीसपाटील प्रतिमा गुजराथी या घरी आल्या. तुझी जनावरे भातात गेलीत. चल माझ्याबरोबर तुला दाखवायला नेते, असे सांगून त्यांनी घराच्या बाहेर आणले. अंगणात त्यांची पत्नी, मुलगी अंकिता आणि पोलीसपाटील प्रतिभा गुजराथी उभ्या होत्या.ह्यमाझी जनावरे तुमच्या भातशेतात गेली असतील तर तुमचे जे काही नुकसान झाले असेल, ते मी भरून देतो, असे अंकुश निवाते यांनी पोलीसपाटील यांना सांगितले. पण काहीही ऐकून न घेता मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी त्यांचे मुलगे प्रसाद आणि प्रवीण हे दोघे आले.

प्रसादने त्याच्याकडच्या बॅटने डोक्यात जोरात फटका मारला. त्याचवेळी प्रवीणने उजव्या पायावर त्याच्या हातातल्या काठीने फटका मारला. त्याचवेळी त्यांची पत्नी आणि मुलगी अंकिता सोडविण्यासाठी पुढे आल्या. तेव्हा प्रसादने दांडक्याने पत्नीच्या हाता -पायावर फटके मारले. दोघांनी अंकुश यांच्या पायावर मारल्याने त्यांना उठता येत नव्हते.त्यानंतर पोलीसपाटील, प्रसाद आणि प्रवीण यांनी शिविगाळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यावेळी प्रसादने मारण्याची धमकी दिल्याचेही म्हटले आहे. अंकुश निवाते यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रतिभा गुजराथी यांनीही निवाते यांच्याविरुध्द तक्रार केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस