Cyclone Nisarga: भरकटलेल्या बार्जवरील १३ खलाशांसाठी बचावकार्य सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 12:42 IST2020-06-03T12:42:34+5:302020-06-03T12:42:46+5:30
मिऱ्या समुद्र किनाऱ्यानजिक नांगरून ठेवलेल्या बार्जला वादळाचा तडाखा बसला.

Cyclone Nisarga: भरकटलेल्या बार्जवरील १३ खलाशांसाठी बचावकार्य सुरू
रत्नागिरी : वादळी वारा आणि लाटांच्या तडाख्यात सापडलेले बार्ज अखेर पांढरा समुद्र येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर येऊन धडकले आहे. या बार्जमध्ये १३ खलाशी असून, त्यांच्या बचावासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. स्थानिक नागरिकही बचावकार्यात सहभागी झाले आहेत.
मिऱ्या समुद्र किनाऱ्यानजिक नांगरून ठेवलेल्या बार्जला वादळाचा तडाखा बसला. वादळी वारे आणि लाटांच्या तडाख्यामुळे हे बार्ज भरकटले. हे बार्ज भगवती बंदर येथे नांगरून ठेवण्यात आले होते. मात्र लाटांच्या तडाख्याने नांगर तुटल्याने बार्ज भरकटले. भगवती बंदर येथून भरकटलेले जहाज लाटांच्या तडाख्याने पांढरा समुद्र किनाऱ्यानजिक पोहचले. समुद्राच्या भरतीसोबत हे बार्ज जाऊन किनाऱ्यावर उभारलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर आढळले. यामध्ये बार्जचे नुकसान झाले नसून, बार्जसह खलाशांच्या बचावासाठी काम सुरू आहे.