सायकलने केला २६ तासात मुंबई-चिपळूण प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:51 IST2020-12-22T17:49:42+5:302020-12-22T17:51:07+5:30
Cycling Ratnagiri- राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वाहनाचालकांमध्ये वाहतूक सुरक्षेविषयी जनजागृती व्हावी, यासाठी मूळचा कबड्डीपटू असलेला व सध्या मुंबई वाहतूक पोलीस शाखेत कार्यरत असलेल्या प्रितेश शिंदे याने मुंबई ते कोळकेवाडी (ता. चिपळूण) हा प्रवास सायकलने केला आहे.

सायकलने केला २६ तासात मुंबई-चिपळूण प्रवास
चिपळूण : राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वाहनाचालकांमध्ये वाहतूक सुरक्षेविषयी जनजागृती व्हावी, यासाठी मूळचा कबड्डीपटू असलेला व सध्या मुंबई वाहतूक पोलीस शाखेत कार्यरत असलेल्या प्रितेश शिंदे याने मुंबई ते कोळकेवाडी (ता. चिपळूण) हा प्रवास सायकलने केला आहे.
तालुक्यातील कोळकेवाडी गावचा सुपुत्र असलेल्या प्रितेशने तालुक्यातील कबड्डीचे मैदान चांगलेच गाजवले आहे. महामार्ग पोलीस अंतर्गत अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) भूषणकुमार उपाध्याय यांच्या कार्यालयात प्रितेश हा कार्यरत आहे. महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, याकरिता जनजागृती करताना प्रितेश याने मुंबई ते चिपळूण - कोळकेवाडी हा प्रवास सायकलने केला.
या प्रवासादरम्यान वाहनचालकांना माहितीपत्रक देत मार्गदर्शन केले. शनिवार, दिनांक १९ रोजी सकाळी ९ वाजता प्रितेश हा दादर येथून सायकलने प्रवासाला निघाला. शनिवारी रात्री त्याने महाड येथे विश्रांती घेतली. त्यानंतर महाड येथून पहाटे तीन वाजता तो चिपळूणच्या दिशेने निघाला. रविवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास तो बहादूरशेख नाका येथे पोहोचला. तिथे पोलीस व नागरिकांनी त्याचे स्वागत केले. चिपळूण पोलीस ठाण्यातील कर्मचारी, शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, प्रितेश याचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.
\