रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा खगोलशास्त्र विभाग, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व पुणे येथील सेंटर फॉर सिटीझन सायन्स संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी कंकणाकृती ग्रहणाचा अभ्यास करण्यात आला. ग्रहण पाहण्याची शेकडो शहरवासियांनी जवाहर मैदानात गर्दी केली होती. ग्रहण पाहण्यासाठी प्राजेक्शन स्क्रीन, रिडीयशन फिल्टरचे गॉगल उपलब्ध करून देण्यात आले होते.अमावस्येच्या सकाळी ८ ते १२ कंकणाकृती सूर्यग्रहणरत्नागिरीतून मात्र खंडग्रास सूर्यग्रहण दिसले. सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी स्पर्शग्रहणास सुरूवात झाली. नऊ वाजून वीस मिनिटांपासून सावलीने सूर्याचा ७० ते ७५ टक्के भाग व्यापला होता. सकाळी १० वाजून ४४ मिनिटांनी ग्रहण संपले. ग्रहण पाहण्यासाठी जवाहर मैदानात फिल्टरसहित दोन दुर्बिणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.मुलांसाठी व नागरिकांसाठी खास प्रोजेक्शन स्क्रीन ग्रहण पाहण्यासाठी लावण्यात आली होती. याशिवाय रेडियशन फिल्टरचे गॉगलही उपलब्ध करून देण्यात आले होते. ग्रहण कालावधीतील सूर्याच्या विविध कला नागरिकांना अनुभवता आल्या. महाविद्यालयातर्फे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सूर्यग्रहण पाहण्यासाठी रत्नागिरीकरांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 18:57 IST
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा खगोलशास्त्र विभाग, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व पुणे येथील सेंटर फॉर सिटीझन सायन्स संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी कंकणाकृती ग्रहणाचा अभ्यास करण्यात आला. ग्रहण पाहण्याची शेकडो शहरवासियांनी जवाहर मैदानात गर्दी केली होती. ग्रहण पाहण्यासाठी प्राजेक्शन स्क्रीन, रिडीयशन फिल्टरचे गॉगल उपलब्ध करून देण्यात आले होते.
सूर्यग्रहण पाहण्यासाठी रत्नागिरीकरांची गर्दी
ठळक मुद्देसूर्यग्रहण पाहण्यासाठी रत्नागिरीकरांची गर्दीमुलांसाठी व नागरिकांसाठी खास प्रोजेक्शन स्क्रीन