शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

धरणात पाणी असूनही पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 15:33 IST

dam, water shortage, Ratnagiri , Rajapur धरणे बांधून पूर्ण आहेत, आतमध्ये तुडुंब पाणीसाठा आहे. मात्र कालव्यांचा पत्ताच नसल्याने तालुक्यातील भातशेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी एक टिपूसभरही पाणी जनतेला मिळत नाही तर दुसरीकडे निधीची तरतूद नसल्याने काही धरणे अपूर्णावस्थेत आहेत. परिणामी तालुक्यातील जनतेला दरवर्षी उग्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे विदारक चित्र राजापूर तालुक्याचे आहे. मागील काही वर्षे तालुक्याची अशीच स्थिती आहे. मात्र, शासनाकडून त्याबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याने धरणात पाणी असूनही राजापूरच्या जनतेवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देधरणात पाणी असूनही पाणीटंचाईचे संकटराजापुरातील धरणाच्या पाण्याचा उपयोग शून्यच

राजापूर : धरणे बांधून पूर्ण आहेत, आतमध्ये तुडुंब पाणीसाठा आहे. मात्र कालव्यांचा पत्ताच नसल्याने तालुक्यातील भातशेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी एक टिपूसभरही पाणी जनतेला मिळत नाही तर दुसरीकडे निधीची तरतूद नसल्याने काही धरणे अपूर्णावस्थेत आहेत. परिणामी तालुक्यातील जनतेला दरवर्षी उग्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे विदारक चित्र राजापूर तालुक्याचे आहे. मागील काही वर्षे तालुक्याची अशीच स्थिती आहे. मात्र, शासनाकडून त्याबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याने धरणात पाणी असूनही राजापूरच्या जनतेवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.गेल्या काही वर्षात या परिसरात अनेक धरणे बांधली. त्यामध्ये अर्जुना नदीवर अर्जुना खोरे प्रकल्प, पाचल दिवाळवाडी, तळवडे, परुळे, ओझर, ताम्हाने, वाळवड, केळवली, कळसवली, वाटूळ, काजिर्डा, जामदा प्रकल्प, जुवाटी, कोंड्ये, पांगरे, चिखलगाव यांचा सामावेश आहे. त्यापैकी काही धरणे बांधून पूर्ण आहेत, तर निधी नसल्याने काही धरणे अपूर्णावस्थेत आहेत. आजवर या सर्व धरणांवर अब्जावधी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, एवढा खर्च होऊनही समस्त जनतेला पाणी मिळालेले नाही, हेच सत्य अधोरेखित ठरले आहे. तालुक्यात अर्जुना व जामदा असे दोन मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी अर्जुना धरण पूर्ण आहे. आता केवळ पाईपलाईन टाकायची बाकी आहे. तर गेले सहा, सात वर्षे जामदा खोरे प्रकल्प रखडला आहे. यापूर्वी झालेल्या सिंचन घोटाळ्यात जामदा प्रकल्प सापडल्याने त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे जामदाचे काम सुरु झालेले नाही.तालुक्यात पाचल दिवाळवाडीसह ओझर तळवडे, पाचल येथील धरणे बांधून अनेक वर्षे झाली. मात्र, एवढ्या वर्षात त्या धरणातून कालवेच न काढल्याने धरणातील तुडुंब साचलेला पाणीसाठा कायम राहतो. तालुक्यातील पूर्ण बांधण्यात आलेल्या धरणांची अशी स्थिती आहे. काही धरणात गाळ साचला आहे. तळवडे धरणातून तर पाणी झिरपत असते. धरणाला गळती लागली आहे. पाचलच्या धरणातून तर एकदा तडे जाऊन मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडत होते. त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता. नंतर त्या धरणाची भिंत पाडून नव्याने बांधली गेली होती. त्यानंतर धोका टळला असला तरी आतील पाण्याचा भातशेतीसाठी वापर होत नाही असेच चित्र आहे.शासनाच्या मूळ उद्देशाला तडाचतालुकावासियांना भातशेतीसह पिण्याच्या पाण्याची भेडसावणारी पाणीटंचाई दूर व्हावी, या उद्देशाने शासनाने धरणे बांधली. मात्र, आज एकूणच या धरणांची स्थिती पाहता शासनाच्या मूळ उद्देशाला तडा गेला आहे, अशी तालुक्यातील धरणांची अवस्था बनली आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई कायम आहे. याबाबत शासनाने तालुक्यातील धरणांचा आढावा घ्यावा. अपूर्ण धरणे बांधून पूर्ण करावीत व सर्व धरणातून समस्त शेतकरी बांधवांसह जनतेला मुबलक स्वरुपात पाणी मिळेल, त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे .

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीकपातRatnagiriरत्नागिरीRajapurराजापुर