शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime: कौटुंबिक वादातून चुलत भावाचा खून, नांदगाव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 12:07 IST

डोक्यात लाकडी दांडका मारला, चुलत भावाचा जागीच मृत्यू झाला

चिपळूण : पूर्ववैमनस्यातून उफाळलेला वाद विकोपाला जाऊन एका तरुणाने आपल्याच चुलत भावाचा डोक्यात लाकडी दांडक्याने मारून खून केला. ही घटना तालुक्यातील नांदगाव-भुवडवाडी येथे सोमवारी (दि.६) घडली.सुरेश केशव भुवड (४५, रा. नांदगाव-भुवडवाडी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र महादेव भुवड (४४, रा. नांदगाव-भुवडवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची फिर्याद अनंत राजाराम मोहिते (४५, रा. नांदगाव-भुवडवाडी) यांनी दिली आहे.महेंद्र व सुरेश हे नात्याने चुलत भाऊ आहेत. या दोन्ही कुटुंबांमध्ये पूर्वीपासून वाद आहेत. सुरेश हा महेंद्रच्या आई-वडिलांना शिवीगाळ करीत असे. काही महिन्यांपूर्वी त्याने महेंद्रच्या वडिलांना मारहाणही केली होती. त्यांच्यातील वाद अनेकदा सावर्डे पोलिसातही गेला आहे.सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेल्याने महेंद्रने सुरेश याच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने वार केले. यात सुरेश गंभीर जखमी होऊन जागीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सावर्डे पोलिस ठाण्याचे निरीक्षक भरत धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी महेंद्रला अटक केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस