चरवेलीत टेम्पो-कार धडकेत दापत्य आश्चर्यकारक बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:39 PM2019-08-31T12:39:03+5:302019-08-31T12:39:45+5:30

मुंबई- गोवा महामार्गावर पालीनजिक चरवेली बसस्थानकाजवळ शुक्रवारी आयशर टेम्पो व कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोघे जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की, टेम्पो चारचाकीवरून पलिकडे जाऊन उलटला. या मोटारीतील दांपत्य आश्चर्यकारकरित्या बचावले.

The couple survived a stunning rescue of a tampo-car in Chervelley | चरवेलीत टेम्पो-कार धडकेत दापत्य आश्चर्यकारक बचावले

चरवेलीत टेम्पो-कार धडकेत दापत्य आश्चर्यकारक बचावले

googlenewsNext
ठळक मुद्देचरवेलीत टेम्पो-कार धडकेत दापत्य आश्चर्यकारक बचावलेरत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दोघांना तातडीने दाखल

रत्नागिरी : मुंबई- गोवा महामार्गावर पालीनजिक चरवेली बसस्थानकाजवळ शुक्रवारी आयशर टेम्पो व कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोघे जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की, टेम्पो चारचाकीवरून पलिकडे जाऊन उलटला. या मोटारीतील दांपत्य आश्चर्यकारकरित्या बचावले.

या घटनेची माहिती अशी, शुक्रवारी सायंकाळी ४.१० वाजता टेम्पो (एमएच ०६, एक्यू ९९४५) मुंबईहून गोव्याला चालला होता. त्याचवेळी समोरून एमएच ०८, आर ८७१२ ही कार चालली होती. चरवेली बसस्टॉप जवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

त्यात कारमधील रत्नागिरीचे नितीन सीताराम पदेरे (वय ५१) व नीलम नितीन पदेरे (वय ४८) हे दापत्य जखमी झाले. पदेरे वांझोळे (ता. संगमेश्वर) येथून आईचे कार्य उरकून रत्नागिरीला चालले होते. ते पोलीस खात्यात आहेत. सध्या ते माळनाका रत्नागिरी येथे राहतात. टेम्पोचालकाचे नाव सुरजकुमार महती आहे.

अपघात एवढा भीषण होता की कारच्या टफवरून टेम्पो पलीकडे गेला व उलटला. त्यात कारच्या टफची पूर्ण दामटी झाली आहे. त्यातील दापत्य आश्चर्यकारक रित्या बचावले.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची हातखंबा येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी आली. त्यातून दोघांना रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले.

अपघातस्थळी लोकांची मोठी गर्दी केली. पाली येथील पोलीस संजय झगडे व महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून वाहने बाजूला केली व वाहतूक सुरळीत केली. परिसरात सर्वत्र या भीषण अपघाताचीच चर्चा सुरू होती.

Web Title: The couple survived a stunning rescue of a tampo-car in Chervelley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.