रत्नागिरी नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 09:02 PM2020-11-18T21:02:44+5:302020-11-18T21:03:37+5:30

politics, ratnagiri, muncipaltycarporation रत्नागिरी शहरातील १३ कोटी रूपयांहून अधिक कामे ही नगरसेवकांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या किंवा अन्य नावाच्या आधारे केली असल्याचे पत्र नगर परिषदेसह जिल्हाधिकारी, मंत्री उदय सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, माजी खासदार नीलेश राणे, उद्योजक किरण सामंत यांना पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेत मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

Corruption in Ratnagiri Municipal Council? | रत्नागिरी नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचार?

रत्नागिरी नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचार?

googlenewsNext
ठळक मुद्देरत्नागिरी नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचार? दिवसभर पत्राची नगर परिषद कर्मंचाऱ्यांमध्ये चर्चा

रत्नागिरी : शहरातील १३ कोटी रूपयांहून अधिक कामे ही नगरसेवकांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या किंवा अन्य नावाच्या आधारे केली असल्याचे पत्र नगर परिषदेसह जिल्हाधिकारी, मंत्री उदय सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, माजी खासदार नीलेश राणे, उद्योजक किरण सामंत यांना पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेत मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

रत्नागिरीमध्ये नगरसेवकच मक्तेदार बनत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी कोणत्या नगरसेवकाच्या/ नगरसेविकेच्या मुलाने किती रूपयांचे कोणते काम केले आहे, या सगळ्याचा विस्तृत पाढाच वाचण्यात आला आहे. याखेरीज आपल्या प्रभागात कमिशन घेतल्याशिवाय कामेच करू न देणारा नगरसेवक कोण याबाबतही माहिती देण्यात आली आहे.

शहरातील १३ कोटी १० लाख रूपये खर्चाच्या कामांचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. विरोधी पक्षाचे दोन नगरसेवक यात सहभागी असल्याचा मुद्दाही नमूद आहे. हे पत्र पाठवणाऱ्याने त्यावर शहर विकास कार्यकर्ते एवढेच नमूद केले असून, जर या अर्जाची चौकशी झाली नाही तर एक हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्याचा इशाराही दिला आहे. शहरातील चार मोठ्या बिल्डरनी बेकायदेशीर कामे केली असल्याचा मुद्दाही यात स्पष्ट करण्यात आला आहे. दिवसभर या पत्राची चर्चा नगर परिषद कर्मंचाऱ्यांमध्ये सुरू होती. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Corruption in Ratnagiri Municipal Council?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.