CoronaVirus Lockdown : चाकरमान्यांना सोडून जाणारी दीडशे वाहने पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:41 IST2020-05-18T18:39:52+5:302020-05-18T18:41:31+5:30
मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना कोकणात सोडून परतीच्या मार्गावर असलेल्या सर्व वाहनांना खेड पोलिसांनी कशेडी घाटात रोखून त्यांच्यावर कारवाई केली. कारवाईत ही सर्व वाहने ताब्यात घेण्यात आली असून, ती खेड शहरातील गोळीबार मैदानावर तब्बल दीडशे वाहने उभी करुन ठेवण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

CoronaVirus Lockdown : चाकरमान्यांना सोडून जाणारी दीडशे वाहने पोलिसांच्या ताब्यात
खेड : मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना कोकणात सोडून परतीच्या मार्गावर असलेल्या सर्व वाहनांना खेड पोलिसांनी कशेडी घाटात रोखून त्यांच्यावर कारवाई केली. कारवाईत ही सर्व वाहने ताब्यात घेण्यात आली असून, ती खेड शहरातील गोळीबार मैदानावर तब्बल दीडशे वाहने उभी करुन ठेवण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये अडकून पडलेल्या कोकणातील चाकरमान्यांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात चाकरमानी येऊ लागले. लॉकडाऊननंतर सुनसान झालेल्या मुंबई - गोवा महामार्गावर चाकरमान्यांना घेऊन येणारी हजारो वाहने धावू लागली.
चाकरमान्यांना रत्नागिरी जिल्ह्यात सोडून मुंबईत परत जाणारी वाहने पुन्हा चाकरमान्यांना घेऊन कोकणात येत होती. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या आणि त्याचबरोबर कोरोनाबाधीतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली होती.
जिल्ह्यात वेगाने फैलावणाच्या कोरोनाला प्रतिबंध करायचे असेल तर मुंबई, पुणे येथून येणाऱ्या चाकरमान्यांना रोखण्याशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात आल्याने जिल्हा प्रशासनाने चाकमान्यांना सोडून परतीच्या मार्गावर असलेली वाहने ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली आहे.