रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या शाळेत क्वॉरंटाईन केलेल्या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पोंझिटीव आल्यानंतर त्याने पलायन केले होते, मात्र प्रेमाने त्याची समजूत घालून पोलिसांनी त्याला पुन्हा शाळेत क्वॉरंटाईन केले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये शाळेत क्वॉरंटाईन असलेल्या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पोंझिटीव आल्यानंतर तो रुग्ण गेला पळून गेला होता, परंतु आज त्याला डी.वाय.एस.पी. प्रवीण पाटील, दाभोळ पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. सुनील पवार, पी. एस.आय. कदम व पोलिस मित्राच्या पथकाने बोरिवली गावातच पकडले. पोलीसांनी त्याला पुढील उपचाराकरिता दापोली येथे आणले आहे.
पोलिस पथकाने प्रेमाने समजावत रुग्णाला दाभोळ कोळथरे येथे पकडले व पुढील उपचारासाठी दापोली रूग्णालयात पाठवले. रुग्ण मुंबई येथून आल्याने गावात असलेल्या शाळेत क्वॉरंटाईन केले होते.चार रुग्ण सापडले होते त्यातील एकजण पळून गेल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली होती. त्यामुळे या कोरोना रुग्णाला शोधण्यासाठी पोलिस, ग्रामस्थ यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्याला पकडल्याने सर्वानीच सुटकेचा निःश्वास घेतला आहे.