CoronaVirus In Ratnagiri: दोन दिवसांत कोरोनावर ७ रुग्णांची मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:31 IST2020-05-18T18:30:17+5:302020-05-18T18:31:38+5:30

गेल्या दोन दिवसांत कोरोनावर ७ रुग्णांनी मात केली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९२ रुग्ण झाले असून यामध्ये ८६ रुग्णांचा समावेश आहे.

CoronaVirus Lockdown: 7 patients overcome Corona in two days | CoronaVirus In Ratnagiri: दोन दिवसांत कोरोनावर ७ रुग्णांची मात

CoronaVirus In Ratnagiri: दोन दिवसांत कोरोनावर ७ रुग्णांची मात

ठळक मुद्देदोन दिवसांत कोरोनावर ७ रुग्णांची मातकोरोनाग्रस्तांच्या तब्येतीत सुधारणा

रत्नागिरी : गेल्या दोन दिवसांत कोरोनावर ७ रुग्णांनी मात केली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९२ रुग्ण झाले असून यामध्ये ८६ रुग्णांचा समावेश आहे.

दररोज जिल्ह्यात चाकरमान्यांची संख्या वाढत चालली आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्याहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची जिल्ह्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. जिल्ह्यात संस्थात्मक क्वारंटाईनची संख्याही जास्त झाल्याने आता होम क्वारंटाईनवर भर देण्यात येत आहे.

चाकरमान्यांच्या वाढत्या संख्येसह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्येतही वाढ होत असल्याने जिल्हावासियांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी जिल्ह्यातील ५ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नर्सिंग कॉलेजची विद्यार्थिनी व अन्य चार जणांचा समावेश आहे. आज सोमवारी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांनाही रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यामध्ये खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालय आणि रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालय येथील प्रत्येक एक रुग्ण आहे.

जिल्ह्यात एकूण ९२ रुग्ण झाले असून, त्यापैकी १७ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच ३ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून, उर्वरित ७२ रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत

Web Title: CoronaVirus Lockdown: 7 patients overcome Corona in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.