CoronaVirus : चिपळूण शहरात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 13:29 IST2020-05-28T12:30:05+5:302020-05-28T13:29:44+5:30
चिपळूण शहरातील मार्कंडी - विठ्ठलाई नगर भागात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. चिपळूण शहरातील नागरिक भीतीच्या छायेखाली असून, हा पॉझिटिव्ह रुग्ण कोणाकोणाच्या संपर्क आला याचा शोध सुरू आहे.

CoronaVirus : चिपळूण शहरात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण
चिपळूण : शहरातील मार्कंडी - विठ्ठलाई नगर भागात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. चिपळूण शहरातील नागरिक भीतीच्या छायेखाली असून, हा पॉझिटिव्ह रुग्ण कोणाकोणाच्या संपर्क आला याचा शोध सुरू आहे.
बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये चिपळूण शहरातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाचा आता शहरातही शिरकाव झाला आहे. शहरानजीकच्या भागांमध्ये आत्तापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळले होते. परंतु, शहरात आजवर कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता.
काही दिवसापूर्वी व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार बाजारपेठ सुरू करण्यासाठी परवानगी दिली गेली. त्यातच बुधवारी आलेल्या अहवालातील एक रुग्ण शहरातील मार्कंडी येथील असल्याने खळबळ उडाली आहे. मार्कंडी येथील हा ३४ वर्षीय रुग्ण गोल्डनसॅन्ड अपार्टमेंट येथील असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान, चिपळूण शहरात पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, शहरात कोरोनाचा रुग्ण आढळताच रात्री मार्कंडी परिसर सील करण्यात आला आहे. याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.