Suicide : बहीण, आईपाठोपाठ त्यानेही जग सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 20:18 IST2020-09-22T19:19:51+5:302020-09-22T20:18:13+5:30
बहीण आणि आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मानसिक स्थिती बिघडलेल्या एका तरूणाने विषारी औषध प्राशन करून स्वत:चे आयुष्यही संपवल्याची हृदयद्रावक घटना संगमेश्वर तालुक्यातील पांगरी मोठीवाडी येथे घडली. उपचार सुरु असताना या तरूणाने जिल्हा शासकीय रुग्णालयात तरुणाने शेवटचा श्वास घेतला. चंद्रकांत गंगाराम गार्डी (३५, पांगरी मोठीवाडी, ता. संगमेश्वर) असे त्याचे नाव आहे.

Suicide : बहीण, आईपाठोपाठ त्यानेही जग सोडले
रत्नागिरी : बहीण आणि आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मानसिक स्थिती बिघडलेल्या एका तरूणाने विषारी औषध प्राशन करून स्वत:चे आयुष्यही संपवल्याची हृदयद्रावक घटना संगमेश्वर तालुक्यातील पांगरी मोठीवाडी येथे घडली. उपचार सुरु असताना या तरूणाने जिल्हा शासकीय रुग्णालयात तरुणाने शेवटचा श्वास घेतला. चंद्रकांत गंगाराम गार्डी (३५, पांगरी मोठीवाडी, ता. संगमेश्वर) असे त्याचे नाव आहे.
चंद्रकांतची बहीण कुंदा हिचा ११ दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर पाठोपाठ चारच दिवसांनी त्याची आई इंदिरा यांचे निधन झाले. या दोघींच्या मृत्यू चंद्रकांतला चटका लावणारा होता. त्यामुळे त्याची मानसिक स्थिती ढासळली. या मन:स्थितीत त्याने १८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गवतावर फवारणी करण्याचे विषारी औषध प्राशन केले.
त्यामुळे त्रास होऊ लागल्याने त्याला प्रथम देवरुखमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.